मुंबई- अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६० वर्षीय शेजाऱ्यानेच १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. धारावीतील ही धक्कादायक घटना आहे. मास्क घालून स्वतःची ओळख लपवून आरोपीने चिमुरडीवर हल्ला केला होता.
झटापटीत आरोपीचा मास्क थोडा बाजूला झाला, तसेच अल्पवयीन मुलीने आवाज ओळखल्याने नराधमाचे बिंग फुटलं. आरडाओरड केल्यास गळा कापण्याची तसेच कोणाला काही सांगितल्यास ॲसिड फेकण्याची आरोपीने धमकी दिली होती.