Mumbai Dharavi: धारावी पूनर्विकास प्रकल्पाला मुलुंडमधील जागा हस्तांतरीत करा; गृहनिर्माण विभागाचे आदेश

Dharavi in Mumbai
Dharavi in Mumbaisakal media
Updated on

Mumbai Dharavi: मुंबई महानगरपालिकेची मुलुंड येथील १४६ एकर जमिन आणि मुलुंडच्या जकात नाका येथील १८ एकर जमिन धारावी पुनर्विकास प्रकल्पास हस्तांतरीत करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना एका पत्राद्वारे दिले आहेत.

Dharavi in Mumbai
Mumbai News : मुंबईची होणार आर्थिक कोंडी; महसूलाचे स्त्रोत घटले, प्रकल्पांचा खर्च वाढला

शासनाने धारावी पुनर्विकास प्रकल्प विशेष प्रकल्प म्हणून घोषित करून या प्रकल्पाला महत्वपूर्ण सार्वजनिक प्रकल्प असा दर्जा दिला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि.मध्ये पात्र रहिवाशांसाठी मोफत घरे तसेच सुमारे साडे तीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडेतत्वावरील घरे बांधायची आहेत.

Dharavi in Mumbai
Mumbai Pune Express Way: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे गुरूवारी पाच तास बंद

मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिल्याप्रमाणे धारावी पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण परवडणारी भाडेतत्वावरील घरे बांधण्यासाठी लागणारी जमिन मिळविण्याचा प्रयत्न करेल, असे नमूद करण्यात आले आहे. या जमिनीच्या भूसंपादनाचा खर्च धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. द्वारे दिला जाईल, राज्य सरकारने याबाबतच्या कराराला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली होती.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार अपात्र झोपडीधारकांना भाडेतत्वार घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत तसेच पात्र झोपडीधारकांना मोफत घरे उपलब्ध होतील. त्यासाठी जमीनीची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची मुलुंड येथील ४६ एकर जमिन आणि मुंबई महानगरपालिकेची जकात नाका मुलुंड येथील १८ एकर जमिन धारावी पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात यावी, असे निर्देश गृहनिर्माण विभागाने नगरविकास विभाग आणि पालिका आयुक्तांना दिले आहेत.

Dharavi in Mumbai
Dharavi Project: धारावीचा विशेष प्रकल्प; पात्र-अपात्र सर्वांना घरं मिळणार; पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.