मुंबई : सायबर फसवणुकीच्या घटनांनी मुंबई शहरात थैमान घातले आहे, मुंबईत दररोज 3 ते 4 सायबर क्राईमचे गुन्हे दाखल होत आहेत. मुंबई पोलिसांनी सायबर वागणूकीच्या गुन्ह्यांना 15 प्रकारात वर्गीकृत करून यादी तयार केली आहे. मात्र चिंतादायक बाब म्हणजे पोलिसांचा सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचा दर फक्त 12 टक्क्यांएवढा आहे.
12% प्रकरणाची उकल
मुंबई पोलिसांच्या अधिकृत आकडेवारीवर आधारित, मुंबईत या वर्षाच्या जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत सायबर फसवणुकीच्या 2861 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी केवळ 323 गुन्ह्याची उकल करत 467 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या आणि शोध दर यांच्यातील महत्त्वपूर्ण अंतर दर्शवतो. फक्त 12% प्रकरणांची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सायबर फसवणुकीचे 15 प्रकारचे गुन्हे घडले आहेत.त्यातील प्रामुख्याने
फिशिंग घोटाळे: या घोटाळ्यात सायबर फसवणूक करणारे अधिकृत संस्था किंवा कंपनी म्हणून दर्शवत फसवणूक करतात एखाद्या व्यक्तीच्या लॉग इन तपशील, आर्थिक तपशील किंवा वैयक्तिक डेटा यासारखी संवेदनशील माहितीच्या आधारे फसवणुक करण्यात येते. मुंबईत फिशिंगची 34 प्रकरणे नोंदवली गेली आहेत ज्यात 7 आरोपींना अटक करून 5 प्रकरणांची उकल झाली आहे.
- ऑनलाइन बँकिंग फसवणूक: यात सायबर गुन्हेगार पीडितांच्या बँक खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवत ऑनलाइन बँकिंग प्रणालीमधील असुरक्षिततेचा फायदा घेतात. ज्यामुळे ऑनलाईन बँकखात्यातून आरोपीच्या खात्यात हस्तांतरित होते. मुंबईत 541 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 19 आरोपींच्या अटकेने केवळ 18 प्रकरणांची उकल झाली आहे.
सोशल मीडिया फसवणूक: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फसव्या लिंक, बनावट प्रोफाइल, बनावट माहितीच्या आधारे सर्वसामान्याची घोटाळ्यांद्वारे फसवणूक करण्यात येते. या वर्षात जानेवारी ते जुलैसोशल मीडियावर फसवणुकीची 107 प्रकरणे नोंदवली गेली असून 28 आरोपींना अटक करून 30 प्रकरणांची उकल झाली आहे.
गुंतवणूक आणि पॉन्झी स्कीम: यात सायबर गुन्हेगार फसव्या गुंतवणूक योजना ज्या उच्च परताव्याचे आश्वासन देतात. आधीच्या गुंतवणूकदारांना पैसे देण्यासाठी नवीन गुंतवणूकदारांच्या पैशाचा वापर करतात. अखेर पॉन्झी योजना, अखेर कोसळतात आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करतात. या वर्षात गुंतवणूक आणि पॉन्झी योजनांची 42 प्रकरणे नोंदवली गेली असून 20 आरोपींना अटक करून केवळ 6 प्रकरणांची उकल झाली आहे.
या गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि अशा घोटाळ्यांना बळी पडू नये म्हणून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई पोलीस सक्रियपणे काम करत आहेत. या व्यतिरिक्त, पोलिसांनी विविध प्रकारच्या फसवणुकीच्या सायबर फसवणुकीचे वर्गीकरण केले आहे, ज्यात विमा फसवणूक, प्रवेश फसवणूक, बनावट वेबसाइट फसवणूक, क्रिप्टोकरन्सी फसवणूक आणि गुंतवणूक फसवणूक यांचा समावेश आहे.
ऑनलाइन शॉपिंग फसवणूक: ऑनलाइन शॉपिंगशी संबंधित फसवणुकीत ग्राहकाला बनावट वस्तू विकून अथवा ऑर्डर केलेल्या वस्तूची ग्राहकाला डीलीवरी करत नाहीत .परिणामी ओनलाईन व्यवहारादरम्यान सर्वसामान्य बळी पडतात. यावर्षी 81 प्रकरणे नोंदवली गेली आहेत ज्यात फक्त 5 प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसाना यश आले आहेत.
सायबर ब्लॅकमेल आणि सेक्स्टॉर्शन: हॅकिंग, ऑनलाइन परस्पर खासगी संवाद किंवा चोरीच्या डेटाद्वारे मिळवलेली संवेदनशील माहितीच्या आधारे तडजोड अथवा धमकी देऊन गुन्हेगार पीडितांकडे खंडणीची मागणी करतात. सायबर ब्लॅकमेल आणि सेक्स्टॉर्शनची 22 प्रकरणे समोर आली आहेत आणि फक्त 1 प्रकरणाची उकल झाली आहे.
लोन अॅप फ्रॉड: यामध्ये, सायबर गुन्हेगार योग्य कागदपत्रांशिवाय ग्राहकांना छोट्या रक्कमेचे मुक्त कर्ज देतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार ग्राहकाच्या मोबाईल वर लिंक द्वारे खासगी तपशीलात प्रवेश मिळवतात. नंतर ब्लॅकमेल करण्याच्या डावपेचांचा अवलंब करून, सुरुवातीच्या कर्जाच्या रकमेपेक्षा मोठ्या रकमेची खंडणी मागतात. जर मागणी पूर्ण केली नाही तर पिडीत व्यक्तीच्या माहितीचा वापर करून त्यांचे शोषण करतात. या वर्षात मुंबई पोलिसांकडे केवळ 38 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात 9 प्रकरणे सोडवण्यात पोलिसाना यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.