मुंबई बँक : चार जागांवर निवडणूक; दरेकर दोन गटात बिनविरोध विजयी

शिवसेनेचे कमलाकर नाईकही रिंगणात
Pravin darekar
Pravin darekarsakal media
Updated on

मुंबई : मुंबई जिल्हा बँक निवडणुकीत (Mumbai District bank election) आजची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरचे चित्र पाहता 21 पैकी चार जागांवर निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष प्रवीण दरेकर (Pravin Darekar) मजूर आणि नागरी बँक मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले आहेत. तर शिवसेनेचे (Shivsena) कमलाकर नाईक (kamlakar naik) देखील रिंगणात आहेत.

Pravin darekar
मुंबई : सुरेश पुजारीवर वाकोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

दरेकर हे मजूर सहकारी संस्था गटातून बिनविरोध निवडून आले आहेत. तर नागरी बँक गटातून शिवसेनेच्या अभिजीत अडसूळ यांनी यापूर्वीच अर्ज मागे घेतल्याने तेथूनही दरेकर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता दरेकर यांना पुन्हा अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरेकर यांना दोनही जागांवर संचालक म्हणून राहता येणार नसल्याने त्यांना विहित मुदतीत एका संचालकपदाचा राजिनामा द्यावा लागेल. त्यानंतर तेथे पोटनिडवणुक होईल किंवा तेथे स्वीकृत सदस्य केला जाईल.

शिवसेनेच्या अडसूळ यांनी माघार घेतल्याने दरेकरांचा विजय आणखी सोपा झाला हा शिवसेनेलाही धक्का आहे. यामुळे शिवसेनेची एक जागाही कमी झाली. आता बँकेवर शिवसेनेचे आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर व शिल्पा सरपोतदार हे तिघेच संचालक आहेत. कुर्ल्याचे कट्टर शिवसैनिक व माजी नगरसेवक कमलाकर (बाळा) नाईक यांनीदेखील आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत शिवसेनेला चौथी जागा मिळण्याची आशा आहे. सहकार पॅनलच्या झेंड्याखाली ही निवडणूक बिनविरोध व्हावी दरेकर तसेच शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले.

त्याला बऱ्यापैकी यशही आले, बँकेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात युतीही झाली. मात्र अडसूळ यांच्या माघारीमुळे कमलाकर नाईक यांच्या उमेदवारीला शिवसेनेने छुपा पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. मला पक्षाने बंडखोर म्हणून जाहीर केले नाही. आधी मला माघार घेण्यास पक्षाने सांगितले होते, मात्र नंतर मला माघार घेण्यास कोणीही सांगितले नाही. प्राथमिक सहकारी संस्था गटातून शिवसेनेचा उमेदवार नसल्याने मी अर्ज भरला, असे नाईक यांनी सकाळ ला सांगितले. तर निवडणूक होणाऱ्या चार जागांपैकी मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदारसंघातील सहकार पॅनलचे विठ्ठलराव भोसले यांच्याविरोधात सुखदेव चौगुले यांचा अर्ज कायम राहिला आहे. तरीही त्यांनी भोसले यांना पाठिंबा जाहीर केल्याने ते देखील सहजपणे निवडून येतील अशी चिन्हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.