मुंबईतील महिला डॅाक्टरला लसीकरणानंतर दोनवेळा कोरोनाची बाधा

मुंबईतील महिला डॅाक्टरला लसीकरणानंतर दोनवेळा कोरोनाची बाधा

डॉक्टरला तिसऱ्यांदा करोनाचा संसर्ग कसा झाला? यामागची कारणं स्पष्टपणे सांगता येणार नाहीत.
Published on

मुंबई: मुलुंड येथील एक महिला डॅाक्टर (women doctor) जून २०२० पासून तिसऱ्यांदा कोरोना पॅाझिटिव्ह (corona positive) झालीय. विशेष म्हणजे या डॅाक्टरने कोरोना लसीचे डोस घेतल्यानंतरही तिला दोन वेळा कोरोनाची बाधा झालीय. यावर डॅा. श्रुष्टी हालरी (Dr Shrushti Halari) यांनी म्हटलंय की, "सतत संसर्ग होत असल्याने मी गोंधळली आहे. श्रुष्टीला लसीकरणानंतरही (after vaccination) झालेल्या कोरोना संसर्गाचा शोध घेण्यासाठी तिचे स्वॅब नमुने जिनोम सीक्वेन्सिंगसाठी घेण्यात आलेत" टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. (Mumbai doctor tests corona positive thrice twice after vaccination dmp82)

डॉक्टरला तिसऱ्यांदा करोनाचा संसर्ग कसा झाला? यामागची कारणं स्पष्टपणे सांगता येणार नाहीत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यात सार्स २ व्हेरियंट, रोगप्रतिकारक शक्ती पातळी किंवा चुकीचा निदान अहवाल ही देखील कारणं असू शकतात. मुंबई रुग्णालयाच्या तसेच काही संशोधनानुसार, डॅाक्टरांना पुन्हा संसर्ग होत असल्याची नोंद जगभरात झालीय. स्वॅबच्या अहवालानंतरच संसर्ग झालेलं सिद्ध होऊ शकतं.

मुंबईतील महिला डॅाक्टरला लसीकरणानंतर दोनवेळा कोरोनाची बाधा
मुंबईतील कोर्टाचा कंगनाला अंतिम इशारा, अन्यथा अटक वॉरंट अटळ

डॅा. श्रुष्टी लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग का झाला, हे शोधण्यासाठी तिचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहेत. महापालिकेकडून आणि खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून सतत संसर्ग होण्यामागची कारणं शोधली जात आहेत. एफएमआर या संस्थेचाही या संशोधनात सहयोग आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. श्रुष्टीवर उपचार करणाऱ्या डॅा मेहुल ठक्कर यांनी म्हटलंय की, "श्रुष्टीला सतत होणाऱ्या कोरोना संसर्गामागे RTPCR चा चुकीचा अहवाल असू शकतो किंवा दुसऱ्यांदा झालेला कोरोना संसर्ग पुन्हा जुलैमध्ये सक्रिय झाला असेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.