डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी फेज 1 मधील खंबाळपाडा येथील सीएनजी पंपच्या पाठी मागील बाजूस असलेल्या रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपनीना मध्यरात्री 12.50 सुमारास आग लागली. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कल्याण ग्रामीण भागात ही आगीचे लोट दिसत होते.
आगी मुळे कंपनीत स्फोट होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सकाळ पर्यंत आग विझवण्याचे काम सुरु होते.
बुधवारी मध्यरात्री एमआयडीसी फेज 1 मधील खंबाळपाडा येथील सीएनजी पंपच्या पाठी असलेल्या रामसन्स आणि प्रयाग या दोन कंपन्यांना अचानक आग लागली. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की कल्याण व ग्रामीण भागात आगीच्या ज्वाला दिसत होत्या. आगीमुळे कंपन्यांत स्फोट होत होते.
पाठीमागील बाजूस सीएनजी पंप असल्याने व कंपनीत स्फोट होत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आगीची माहिती समजताच डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी येथून अग्निशमन दलाच्या तब्बल 15 च्या आसपास गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, भाजप माजी नगरसेवक साई शेलार, मनापाडा पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि स्वयंमसेवक घटनास्थळी दाखल असून मदत कार्य सुरु केले.
पर्फ्यूम कंपनी रामसन्स कंपनी ही परफ्युम बनविणारी तर प्रयाग ही कपड्याची कंपनी असल्याची माहिती
कामाचे अध्यक्ष देवें सोनी यांनी दिली. दरम्यान ही आग कशामुळे लागली आणि यात काही दुर्घटना झाली आहे का हे अद्याप समजलेले नाही.
गेल्या काही वर्षात डोंबिवली एमआयडीसी मधील कंपन्याना यापूर्वीही मोठं मोठ्या आगी लागल्या आहेत. प्रोबेस कंपनी मधील स्फोट,अंबर केमिकल कंपनीत स्फोट हे न विसरण्यासारखे आहेत.
त्यामुळे एमआयडीसी मधील घातकी केमिकल कंपन्या स्थलांतरीत कराव्या अश्या मागण्या या आधीही नागरिकांनी करू झाल्या आहेत. मात्र यावर अद्याप ठोस उपाय अद्याप सरकाने काढलेला नाही, आतातरी सरकार लक्ष देणार का हे पहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.