Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान
Updated on

Mumbai Police: एका महिलेला भर रस्त्यात प्रसूतीकळा सुरु झाल्या.. वरतून पाऊसदेखील सुरु होता. अशावेळी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे एका महिलेची उघड्यावरच पण सुखरुप प्रसूती झाली आहे.

डोंगरी पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला गस्तीदरम्यान एक ४५ वर्षीय महिला पावसामध्ये अर्धवट प्रसूती अवस्थेत दिसून आली. चार नळ जंक्शन येथे पोलिसांना महिला दिसून आल्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ आजूबाजूचे बॅनर व ताडपत्री गोळा करून महिलेस झाकले व दुसऱ्या एका महिलेची मदत घेतली.

दुसऱ्या एका महिलेच्या मदतीने पोलिसांनी सदरील महिलेची प्रसूती केली. सदर महिलेस जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने योग्य ती काळजी घेत माता व बालकास जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आई व बाळ दोघेही स्वस्थ असून महिलेच्या कुटुंबियांना पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. डोंगरी पोलिस ठाणे निर्भया पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे वरिष्ठांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.