मुंबईत 2.90 कोटींचे ड्रग्स जप्त..

दोन नायजेरीयन नागरिक अटकेत
drugs
drugssakal
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांनी गुरुवारी मानखुर्द परिसरातून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून 2.90 कोटी रुपयांचा मेफेड्रोन एम डी हा अमली पदार्थ जप्त केला आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मायकेल चुकवुमा (34), ओझोकवेसिरी ओकेचुकवू (46) अशी आहेत. दोन्ही आरोपींना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

एका विशिष्ट गुप्त माहितीवर कारवाई करत, मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे युनिटच्या पथकाने गुरुवारी 25 ऑगस्टला पहाटे दीडच्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या महामार्गावरील पॉवर स्टेशनजवळ दोन आरोपीना ताब्यात घेतले. कारवाईत दोन्ही आरोपीकडून पोलिसांनी 2.90 कोटी रुपयांचे 1.4 किलोग्रॅम मेफेड्रोन एमडी जप्त केले. अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकांपैकी एकाचा 2016 मध्ये पालघरमधील तुळींज येथे झालेल्या हत्येमध्ये आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींच्या अमली पदार्थ तस्कर आणि पुरवठादारांच्या नेटवर्कचा उलगडा करण्याच्या दृष्टीने पोलीस तपास करत असून पोलिसांना ते एका संघटित अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा भाग असल्याचाही संशय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()