Drugs Seized : एनसीबीच्या कारवाईत कोटींचे ड्रग्स जप्त; 4 आरोपी अटकेत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मागील एका आठवड्यात केलेल्या कारवायांमध्ये एक कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करत 4 आरोपींना अटक केली.
Drugs Seized
Drugs SeizedSakal
Updated on
Summary

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मागील एका आठवड्यात केलेल्या कारवायांमध्ये एक कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करत 4 आरोपींना अटक केली.

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मागील एका आठवड्यात केलेल्या कारवायांमध्ये एक कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करत 4 आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात फोटो फ्रेम्समध्ये लपवून ड्रग्ज कतर दोहा येथे आणले जाणार होते आणि चार जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थामध्ये 19 किलोग्राम गांजा, 1.15 किलो हायड्रोपोनिक विड, 13,500 नायट्राझेपम गोळ्या आणि 3,840 ट्रामाडॉल गोळ्यांचा समावेश आहे. चारही आरोपी आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याचा एनसीबीला संशय आहे.

फोटोफ्रेम मधून तस्करी

एनसीबीला कुरिअर पार्सलद्वारे कतारमधील दोहा येथे हायड्रोपोनिक नावाच्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटची माहिती मिळाली होती. एनसीबीकडून अमली पदार्थाच्या पार्सलचे तपशील गोळा करण्यात आले आणि तत्काळ तपासणीसाठी परत ठेवण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या पार्सलमध्ये धार्मिक ग्रंथांसह 10 फोटो फ्रेम्स होत्या. बारकाईने तपासणी केल्यावर, फ्रेममध्ये अमली पदार्थ लपवून ठेवलेले एनसीबी अधिकाऱ्यांना आढळले. कारवाई करत अमली पदार्थांचे पार्सल जप्त करण्यात आले.

पार्सलद्वारे तस्करी

एनसीबीला नायट्राझेपम गोळ्यांची आंतरराज्यीय तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवारी, एनसीबीने पाळत ठेवत दोन तस्कराना अटक केली. अटक आरोपीकडून 13500 नायट्राझेपम गोळ्या जप्त करण्यात आल्या. हे अमली पदार्थ मुंबईत वितरित करण्यात येणार होते. अटक करण्यात आलेले दोन आरोपी मूळचे मुंबईतील असून ते इतर राज्यातील अनेक तस्करांच्या संपर्कात होते. अजून एका कारवाईत मुंबईहून अमेरिकेत कुरिअर पार्सलद्वारे ट्रामाडॉल गोळ्यांची बेकायदेशीर तस्करी आंतरराष्ट्रीय सिंडिकेटद्वारे करण्यात येणार असल्याची माहितीही एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, एनसीबीचे अधिकारी गेल्या गुरुवारी 10 नोव्हेंबरला कुरिअर कार्यालयात गेले आणि त्यांना एक पार्सल बॉक्स सापडला ज्यामध्ये ट्रामाडोलच्या गोळ्या लपवून ठेवल्या होत्या. त्यावर कारवाई करत एनसीबिने 3840 गोळ्या जप्त केल्या.

19 किलो गांजाची जप्ती

एनसीबीला आंतरराज्यीय गांजा तस्करी करणाऱ्या सिंडिकेट धुळ्याहून मुंबईला माल पाठवण्याच्या तयारीत अस गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती. या माहिती द्वारे मुदोन वाहक' आणि त्यांच्या तस्करी करण्याच्या मार्गाची तपास अधिकाऱ्यांनी ओळख पटवली. गेल्या शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी सापळा लावून एनसीबीच्या पथकाने दोन तस्कराना पकडले आणि त्यांच्याकडून 19 किलो उच्च दर्जाचा गांजा जप्त केला. अमली पदार्थांची खेप आंध्र प्रदेश-ओडिशा राज्यातून आणली जात होती.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अमली पदार्थांचे तस्कर असून, गेल्या पाच ते सात वर्षांपासून अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेले आहेत. एनसीबी-मुंबईच्या या लागोपाठ कारवायांमुळे अमली पदार्थाच्या पुरवठा करणाऱ्या तस्करांची साखळी तुटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.