Mumbai : पहिल्याच फेरीत 'वंदे भारत' ट्रेनची ६.४८ लाखांची कमाई! २४ मिनिटांपूर्वीच पोहोचली मडगावात

Vande Bharat Express
Vande Bharat Expresssakal
Updated on

मुंबई : मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या पहिल्या फेरीतून ४७७ प्रवास केला असून तब्बल ६.४८ लाखांची कमाई मध्य रेल्वेने केली आहे. विशेष म्हणजे आपल्या नियोजित वेळेपूर्वीच २४ मिनिटे अगोदरच मडगाव स्थानकांवर पोहोचली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

Vande Bharat Express
Mumbai : पावसाळ्यात मध्य रेल्वेचे देशी जुगाड! हार्बर रेल्वे स्थानकांना बांबूच्या मंडपाचा आधार

मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनच्या उदघाटन फेरीनंतर बुधवारपासून सर्वसामान्य प्रवाशांना सेवेत वंदे भारत ट्रेन दाखल झाली. बुधवारी (ता.२८ ) सकाळी ५.२५ वाजता सीएसएमटी स्थानकातून ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मडगावसाठी रवाना झाली.

मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहचणार होती. मात्र, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस ३ वाजून ६ मिनिटानी म्हणजे निर्धारित वेळापूर्वीच २४ मिनिटे अगोदरच मडगाव स्थानकांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे एकूण ५३३ आसन क्षमता असणाऱ्या या ट्रेनमध्ये पहिल्याच फेरीत ४७७ आसन फुल्ल झाली.

Vande Bharat Express
Sharad Pawar: राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? लवकरच संघटनात्मक बदलाची शक्यता

याद्वारे तब्बल ६.४८ लाखांची कमाई झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. ट्रेन क्रमांक २२२२९ सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सीएसएमटीवरून सुटेल आणि मडगाव येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.