Mumbai Election News: रखडलेल्या निवडणुकांचा र्माग मोकळा ; लवकरच होणार तारखा जाहीर!

Mumbai Election News
Mumbai Election Newssakal
Updated on

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट निवडणुकीसंदर्भात निर्माण झालेला पेच सुटण्याच्या मार्गावर आहे. मतदार याद्यांमधील गोंधळासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल विद्यापीठाला सादर केला.

त्यात दुबार नावे आणि इतर काही त्रुटी नसल्याचे सांगत केवळ पदवी प्रमाणपत्राची तपासणी करून पुढील याद्या अद्ययावत करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदार याद्या अद्ययावत केल्या जाणार आहेत. परिणामी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडलेल्या सिनेट पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम विद्यापीठाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजप नेते व आमदार ॲड. आशीष शेलार यांनी दुबार मतदार नोंदणीच्या संशयावरून तीव्र आक्षेप घेत सिनेट निवडणुका स्थगित करण्याची मागणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. दोन दिवसांपूर्वी मतदार नोंदणीसाठी भरलेल्या शुल्काची प्राप्तिकर आणि ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

त्यामुळे अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी मुंबई विद्यापीठाने निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने मतदार याद्या तपासून घेण्यासाठी प्रा. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. त्यात अॅड. प्रवीण सय्यद आणि डॉ. प्रकाश कुंभार आदी सदस्यांचा समावेश होता.

समितीच्या अहवालात यादीमधील ७५६ मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा दिसत असली, तरी त्यातील प्रत्येक मतदार हा वेगळा असल्याचे समितीने नमूद केले आहे. त्यामुळे शेलार यांनी केलेले दावे समितीने खोडून काढले आहेत. तसेच समितीने मतदार यादीत दुबार मतदार नोंदणी झालीच नाही. दोनदा आढळलेली समान नावे वेगवेगळ्या मतदारांची आहेत, असा निष्कर्ष काढला आहे.

Mumbai Election News
BMC Election: आगामी निवडणुकांसाठी भाजपच्या हालचाली; कार्यकारिणीच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

पुन्हा मतदार नव्याने नोंदणी
समितीने २०१७ च्या एकसमान कायदे क्र. दोनच्या तरतुदीनुसार पदवीधरांची मतदार म्हणून नव्याने नावनोंदणी करण्याची शिफारस आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने विद्यापीठाला निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्याच्या दिलेल्या निर्देशानुसार बुधवारी (ता. २५) विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने ३० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पात्र आणि मतदार होऊ इच्छिणाऱ्यांकडून नव्याने अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची यासंदर्भातील अधिसूचनाही जारी केली जाणार आहे.

‘अवमान याचिका दाखल करणार’
न्यायालयात प्रकरण असताना विद्यापीठ मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर कसे करते, असा प्रश्न याचिकाकर्ते ॲड. सागर देवरे यांनी केला आहे. आपण दाखल केलेल्या याचिकेवर अजून अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आपण न्यायालयात नवीन मतदार नोंदणीऐवजी जुन्याच मतदार नोंदणीच्या आधारे निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याची मागणी केली होती; मात्र आता विद्यापीठाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केल्याने आपण याविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे ॲड. देवरे यांनी सांगितले.

Mumbai Election News
Mumbai University Election : मुंबई विद्यापीठ निवडणुकीत ठाकरेंना बसू शकतो फटका; 'या' नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

फौजदारी गुन्हा दाखल करा : शेलार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतदार नोंदणीत चौकशी समितीने दिलेल्या अहवालात घोटाळा झाल्यावर शिक्कामोर्तब केले. तसेच पुन्हा मतदार यादी तयार करा, असे निर्देश विद्यापीठाला दिले. हा एक संघटित आर्थिक घोटाळा आहे. त्यामुळे या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आणि या प्रकरणात तक्रारदार असलेल्या आमदार ॲड. आशीष शेलार यांनी केली आहे.

समितीने नोंदवलेली निरीक्षणे
- सिनेट निवडणुकीसाठी पात्र ठरवलेल्या मतदारांची अंतिम संख्या ९०,२२४ आहे
- ७५६ मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा असली, तरी ते वेगवेगळे मतदार आहेत.
- पदवी प्रमाणपत्रावरील नाव, विषय, विद्याशाखा, निवास पत्ता व वर्ष, अर्जावरील माहितीवरून खात्री
- कोणी मतदान केले हे कळून यावे, यासाठी मतदाराचा फोटो वास्तव्याचे ठिकाण यातून फरक नमूद होईल.
- पूर्वी जाहीर झालेल्या ९४,१६२ मतदारांच्या अंतिम यादीतून काही अर्ज बाद झाले, तर काही स्वीकारले गेले.
- सिनेट निवडणुकीची मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणे उचित ठरेल, असे समितीचे मत आहे.

Mumbai Election News
BMC Election : मुंबई महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची BMC, राज्य सरकारला नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()