मुंबईत येत्या काळातील वाढत्या विजेच्या मागणीसोबतच इलेक्ट्रिक व्हेईकलच्या संख्येतही भर पडणार आहे.
मुंबई - मुंबईत येत्या काळातील वाढत्या विजेच्या मागणीसोबतच इलेक्ट्रिक व्हेईकलच्या संख्येतही भर पडणार आहे. ही वाढती इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या लक्षात घेऊनच बेस्ट उपक्रमाने चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याचा रोडमॅप आखला आहे. बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाच्या वीज वितरण क्षेत्रात प्रत्येत ३ किलोमीटरला इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन बेस्ट उपक्रमाने केले आहे. मुंबई शहर तसेच उपनगरात हे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात येणार आहे.
बेस्टच्या मुंबई शहरातील वीज वितरण क्षेत्रात १६ लाख वीज ग्राहकांना बेस्ट उपक्रम वीज पुरवठा करते. या वीज ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल वापरणाऱ्यांचा टक्का आगामी काळात वाढणार आहे. त्यामुळेच प्रत्येक ३ किलोमीटरवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. मुंबईत एकुण ३३० इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. येत्या हा महिन्यात हे स्टेशन उभारण्याच्या अनुषंगाने काम सुरू होणार आहे. हे चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या २७ डेपोमध्ये सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याठिकाणी खासगी वाहनांसाठीही चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. बेस्टच्या माध्यमातून मुंबई शहरात प्रत्येक ३ किलोमीटर चार्जिंग स्टेशनची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी डेपोसह बेस्टच्या जागांचाही वापर करण्यात येईल. मुंबई शहरात बेस्ट तर उपनगरात अदाणी, टाटा पॉवरकडून या चार्जिंग स्टेशनला विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे.
चार्जिंग स्टेशनचे वीजदेयक, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणी यासाठी टर्न की तत्वावर जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही कंत्राटदाराकडे असणार आहे. त्याठिकाणी कॕफेटेरिया, ग्राहकांना बसण्याची व्यवस्था यासारख्या सुविधा देऊन महसूल निर्मितीही करणे शक्य असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.