Mumbai : अनेक बसेसचे आपात्कालीन दरवाजे उघडतच नाही; खासगी बसेसच्या तपासणीत उघड

Mumbai news
Mumbai news
Updated on

मुंबई : नागपुर - पुणे जाणाऱ्या खासगी बसचा सिंधखेडराजा दरम्यान गंभीर अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर आता नागपुर महामार्ग पोलीस विभागाने समृद्धी महामार्गावर खासगी बसेसची तपासणी सुरू केली आहे.

गेल्या दोन दिवसात ९८ बसेसची तपासणी केली असून, त्यामध्ये बसेसच्या सुरक्षेच्या नियमांची पाहणी केली आहे. त्यामध्ये टायर, रिफलेक्टर, अग्निशमन यंत्रणा आणि जादा प्रवासी वाहतुकीची तपासणी केली असून, यामध्ये आपात्कालीन दरवाजा उघडत नसल्याचे काही प्रकार उघड आले आहे.

Mumbai news
Vidarbha News : मेडीकल कॉलेजमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; आयसीयूतील रुग्ण पळाला

समृध्दी महामार्गावरील नागपूर ते सिंदखेड राजा पर्यंत नागपूर परिक्षेत्राची हद्द आहे. त्यामूळे या हद्दीत नुकताच झालेल्या अपघातामूळे महामार्ग पोलीस विभागा सक्रीय झाले आहे. १ जुलै रोजी झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातमुळे प्रशासनाकडून महामार्गावरील योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत आहे.

त्या दृष्टीने महामार्ग विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र कुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) यांच्या निर्देशानुसार यंशवत सोळंके, पोलीस अधीक्षक, महामार्ग नागपूर यांनी समृध्दी महामार्गावर प्रत्येक वाहनातील टायरची स्थिती, नाट्रोजन हवा, आपतकालीन खिडकी, अग्नीशमन यंत्र, प्रथमोपचार, दोन चालक कंडाक्टर, चालकाचे वैध परवाना, आसणाची क्षमता तपासणी करण्याच्या सुचना दिल्या आहे.

Mumbai news
NCP Constitution: अजितदादा गटाचे अस्तित्व धोक्यात, पक्षाच्या घटनेतील तरतूद ठरणार कळीचा मुद्दा! शरद पवारच बॉस

गेल्या 2 दिवसामध्ये महामार्ग पोलीस विभागाकडून 98 ट्रॅव्हल्सची वरील बाबींची तपासणी केली आहे. शिवाय समृध्दी महामार्गावर टोलप्लाझा अथवा पेट्रोलपंपच्या ठिकाणी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांची सुरक्षित प्रवासाबद्दल जनजागृत्ती केली जात आहे.

महामार्ग पोलीस विभागातील पोलीस अधिकारी,अंमलदार यांचेकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व खबरदारीत्मक उपाययोजना, कसुरदार वाहन चालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई व नागरीकांमध्ये जनजागृत्ती बाबीमुळे समृध्दी महामार्गावर अपघाताच्या संख्येत निश्चितच घट होणेस मदत होईल. तसेच महामार्गावर एखादे वाहन तांत्रिक बाबीमुळे बंद पडल्यास किंवा अपघात झाल्यास त्याबाबतचा हेल्पलाईन क्रमांक 8181818155 व 1800233233 यावर त्वरीत मदत मागण्याचे आव्हान महामार्ग पोलीस विभागाने केले आहे.

या तपासणीमध्ये आपात्कालीन दरवाजे उघड नसल्याचे दिसून आले आहे. त्याला आईलींग,गिरीसींग करून मगच अशा बसेस पुढे पाठवल्या आहे. मद्यप्राशन चाचणी, रिफलेक्टर, दोन चालक एक क्लिनरची पाहणी केली आहे. तर अग्निशमन यंत्रणा, हॅमर कुठे आहे त्यासंदर्भात प्रवाशांना माहिती देण्याचे सांगितले आहे. चालकाच्या कॅबिन मध्ये प्रवासी बसवतांना आढळून आले, त्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गासह इतर महामार्गावर ही तपासणी सुरू आहे.

- यशवंत सोळंके, पोलीस अधिक्षक, नागपुर महामार्ग पोलीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.