मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून मुंबईत 'मुंबई आय' या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.
मुंबई - मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आणि पर्यटनवाढीच्या दृष्टिकोनातून मुंबईत 'मुंबई आय' या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. आता या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न सुरु झाले आहे. एमएमआरडीएने प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प व्यवस्थापकाची नेमणूक करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विनंती प्रस्ताव निविदा मागविण्यात आल्या आहेत.
या निविदेत सांगितल्यानुसार, एमएमआरडीए प्रकल्पासाठी तांत्रिक आणि व्यवहारपूर्वक अभ्यास करणे, प्रकल्प विकासकाची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया व्यवस्थापन करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा पुरविण्यासाठी हा विनंती प्रस्ताव मागविण्यात आला आहे.
एमएमआरडीएच्या १५४व्या बैठकीत 'मुंबई आय' या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने वांद्रे रेक्लेमेशनची जागा सुचविली आहे. तसेच खासगी- सार्वजनिक भागीदारीमध्ये हा प्रकल्प राबविण्याचेही प्रस्तावित केले आहे. एमएमआरडीएने ठरावात मांडलेल्या माहितीनुसार, जगभरातील विविध आकाश पाळणे, त्यांचा व्यास, उंची आणि बांधकाम खर्च इत्यादी बाबींची प्राथमिक माहितीच्या अनुषंगाने, १२०-१५० मी. व्यास असलेला आकाश पाळणा तसेच अनुषंगिक पायाभूत सुविधा, परिसराचा विकास याकरिता अंदाजे २००० कोटी इतका खर्च 'मुंबई आय' प्रकल्पाच्या उभारणीसाठी येईल. त्याचप्रमाणे, पर्यटकांना होणारी तिकिट विक्री, सभोवतालच्या परिसराचा वाणिज्यीक वापर यामधून प्रकल्पाव्दारे अपेक्षित उत्पन्नाचे स्त्रोत असतील.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक आणि 'मुंबई आय' विशेष फेरी
पर्याय म्हणून निवडण्यात आलेल्या जमिनींपैकी वांद्रे रेक्लेमेशन येथून वांद्रे - कुर्ला वित्तीय संकुलाची निकटता, सागरी किनारपट्टीचे दर्शनिय दृश्य, शहराच्या आकाश रेषेचा विलक्षण अनुभव तसेच दादर येथील निर्माणाधीन असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'समानतेचे भव्य स्मारक' याची वांद्रे रेक्लेमेशन पासून असलेली निकटता लक्षात घेत प्रस्तावित 'मुंबई आय' ते सदर स्मारकापर्यंत फेरी सेवा उपलब्ध करुन दोन्ही पर्यटन स्थळे जोडली जाण्याची शक्यता या बाबींचा विचार करता वांद्रे रेक्लेमेशन हे स्थळ सदर प्रकल्प उभारणीकरिता पर्यटन वाढीच्या दृष्टीने अधिक व्यवहार्य आहे, असेही एमएमआरडीएने सुचविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.