Mumbai : पंधरा दिवसांपूर्वी वॉचमन कामावर आला अन् दुकान साफ करून गेला; 6 किलोचे दागिने लंपास

Mumbai
Mumbai
Updated on

डोंबिवली - पंधरा दिवसांपूर्वीच कामावर ठेवलेल्या वॉचमनने पत्नी व इतर साथीदारांच्या मदतीने ज्वेलर्समध्ये दरोडा टाकत तब्बल 6 किलो वजनाचे 3 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे.

ज्वेलर्सच्या दुकानाला लागूनच असलेल्या घरात वॉचमनची रहाण्याची सोय करण्यात आली होती. याच ठिकाणी वॉचमन आणि त्याच्या पत्नीने हा दरोड्याचा प्लॅन रचला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Mumbai
रश्मी ठाकरेंची चौकशी होणार? अलिबागमधील 19 बंगला घोटाळ्याप्रकरणी फडणवीसांनी दिली मोठी अपडेट

याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात वॉचमन महेश त्याची पत्नी व अन्य चार ते पाच साथीदार यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून पोलिस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नंबर 1 मधील शिरु चौकात विजयलक्ष्मी नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. पुरुषोत्तम बदलानी यांचे हे दुकान असून सोमवारी रात्री ते आपले दुकान बंद करुन घरी निघून गेले. दुकानावर त्यांनी नेमलेला सुरक्षारक्षक हा सुट्टीनिमित्त गावी गेला होता.

त्यामुळे महेश याची पंधरा दिवसापूर्वीच सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करत त्याला कामावर ठेवण्यात आले होते.ज्वेलर्सच्या जवळच्याच खोलीत त्याच्या कुटूंबाची राहण्याची सोय करण्यात आली होती. दुकानात कोट्यावधीचा माल असल्याने महेश याची नियत फिरली आणि त्याने पत्नीच्या सहाय्याने दुकानात चोरी करण्याचा प्लॅन आखला.

आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी या परिसरातील सर्व दुकाने ही बंद असतात. या बंदचा फायदा घेत महेशने त्याच्या चार ते पाच साथीदारांसह सोमवारी रात्रीच दुकान फोडण्याचे ठरवले. सोमवारी रात्री 11.30 च्या दरम्यान त्याने साथीदारांना बोलावून घेतले.

Mumbai
Solapur News : सोलापुरात 'लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकण्याचा प्रयत्न; मुस्लिम बांधवांची सतर्कता

महेश रहात असलेल्या घरातून शिडी व नायलॉन रस्सीचा वापर करत दुकान व घराची सामाईक भिंत चढून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील 3 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे सुमारे 6 किलो वजनाचे दागिने चोरुन ते पसार झाले आहेत.

दुकानात चोरी झाल्याची माहिती मालक पुरुषोत्तम यांना बुधवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर समजली. त्यांनी त्वरीत उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्यासह गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा करत गुन्हा नोंद करुन घेतला आहे.

घटनास्थळी पोलिसांना गॅस कटर व चार सिलिंडर आढळून आले आहेत. तसेच जवळपास 6 किलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीची घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()