Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे गोदामाला लागली आग मायलेकाचा होरपळून मृत्यू!

Fire
Fireesakal
Updated on

Bhivandi Fire : गोदामाला शॉर्ट सर्किटने आग लागून तीन वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या आईचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. ७) सायंकाळी ६ च्या सुमारास भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथे घडली. प्रिन्स राजभर (वय ३) व शकुंतला राजभर (वय ३५) अशी मृत्यू झालेल्या मायलेकांची नावे आहेत.

Fire
Nashik Fire Accident: शिंदे गावातील आग तब्बल 18 तासानंतर आटोक्यात; दीड कोटी रुपयांचे नुकसान

भिवंडी तालुक्यातील वळपाडा येथील पारसनाथ कंपाऊंड येथील पहिल्या मजल्यावर टेक्सराईज कापसापासून उशा बनवणारी शेजल इंटरप्रायझेस कंपनी आहे. या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली. कंपनीत शॉर्ट सर्किटने आग लागल्या नंतर या आगीची माहिती मिळताच कंपनीमध्ये काम करणारे महिला व पुरुष कामगार कंपनीमधून बाहेर पळाले. त्यामध्ये शकुंतला हीसुद्धा होती.

परंतु ती बाहेर पडल्यावर तिच्यासोबत आलेला तिचा लहान तीन वर्षांचा प्रिन्स नावाचा मुलगा आतमध्ये राहिल्याचे लक्षात आल्यावर शकुंतलादेवी पुन्हा आतमध्ये मुलाला घेण्यासाठी गेली. ती त्यानंतर बाहेर पडलीच नाही. घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होत त्या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने खाजगी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी छतावरील स्लॅब तोडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करून गोदामाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाथरूमजवळ दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी नारपोली पोलिस व तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दाखल होऊन त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत .

Fire
Nashik Fire Accident: शिंदे गावातील आग तब्बल 18 तासानंतर आटोक्यात; दीड कोटी रुपयांचे नुकसान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()