मुंबईत दहा वर्षात 48 हजार आगी
मुंबई : दहा वर्षात मुंबईत तब्बल 48 हजार 434 आगीच्या घटना (Fire Incidents) घडल्या असून त्यात 609 जणांचा बळी (victims) झाला आहे. यात 29 बालकांचा समावेश आहे. तर, 2020 मध्ये 3 हजार 841 आगीच्या घटना असून त्यात 100 जणांचा मृत्यू (people death) झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे (short circuit) सर्वाधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये 89 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान (Property loss) झाले आहे.
2008 पासून जुलै 2018 पर्यंत 48 हजार 434 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यात 1568 गगनचुंबी इमारती, 8737 रहिवाशी इमारती, 3833 व्यासायिक इमारती आणि 3151 झोपडपाट्यामध्ये आग लागली आहे. सर्वात जास्त तब्बल 32,516 आगीच्या घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्या आहेत. 1116 आग गैस सिलिंडर गळती आणि 11 हजार 889 आगीच्या घटना अन्य कारणांमुळे घडल्या आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी या माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.
उपमुख्य केंद्रनिहाय आगीच्या घटना
1( दक्षिण मुंबई)- 9887 आग लागली असून त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यात आगीच्या घटना घडल्या आहेत.
2(दक्षिण मध्य मुंबई ) - 10,719 आग लागली असून त्यात 129 गगनचुंबी इमारत, 1824 रहिवाशी इमारत, 664 व्यावसायिक इमारत आणि 934 घटना झोपडपट्ट्यांमधील आहेत.
3 (वांद्रे ते अंधेरी,जोगेश्वरी पुर्व )-8 ,717 आग लागली असून त्यात 496 गगनचुंबी इमारत, 1382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
4 (अंधेरी पश्चिम ते दहिसर )8328 आग लागली असून त्यात 289 गगनचुंबी इमारत, 1835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
5 (कुर्ला, चेंबूर पासून मानखुर्द पर्यंत ) 5683 आग लागली असून त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
परिमंडळ 6 (घाटकोपर ते मुलूंड ) 5107 आग लागली असून त्यात 279 गगनचुंबी इमारत, 603 रहिवाशी इमारत, 374 व्यावसायिक इमारत आणि 23 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.
सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत उपमुख्य केंद्र (कमांड सेंटर ) तीन च्या हद्दीत 496 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत कमांड सेंटर चार च्या हद्दीत 1835 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत कमांड सेंट 1 च्या हद्दीत 987 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यात कमांड सेंटर पाच च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी कमांड सेंटर 1 च्या हद्दीत झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.