Mumbai - ठाणे जिल्ह्यात गेले आठवडाभर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला असून डोंगर दऱ्यातील धबधबे देखील वाहू लागले आहे. पावसासोबतच निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबाकडे पर्यटकांची पाऊले आता वळू लागली आहेत.शनिवार रविवार येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
गेले आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने नागरीक सुखावले आहेत. सतत सुरू असलेल्या पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर डोंगर, पर्वत रांगामधून धबधबे वाहू लागले आहेत.
सह्याद्री पर्वत रांगा मधील बदलापूर जवळील कोंडेश्वर धबधबा हा पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असून याकडे आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत.
बदलापूर रेल्वे स्टेशन वरून 7 ते 8 किलोमीटर अंतराव कोंडेश्वर धबधबा आणि मंदिर आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील पर्यटक पाऊस पडला की धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आणि कोंडेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. येथे पर्यटकांना या सुंदर सहलीचे नियोजन करण्यास मदत होऊ शकते. हिरवा निसर्ग आणि निसर्गाची खरी सुंदरता पाहण्यासाठी पावसात भरपूर पर्यटक इथे भेट देत असतात.
बदलापूर मधील कोंडेश्वर हे मंदिर
बदलापूर मधील कोंडेश्वर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे, बदलापूर रेल्वे स्टेशन वरून 7-8 किलोमीटर अंतरावर असलेले भगवान शिव यांना समर्पित कोंडेश्वर मंदिर हे दाट जंगलाच्या मध्यभागी असलेले एक प्राचीन मंदिर आहे.
हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीतील वास्तूंचे प्रतिनिधित्व करते आणि काळ्या दगडांनी बनवले गेले आहे. महाशिवरात्री हा या मंदिरात साजरा होणारा मुख्य उत्सव आहे. पावसाळ्यात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते.या मंदिराच्या परिसरात छोटी मंदिरे, श्री.खतेश्वर महाराज समाधी, तलाव आणि धबधबा आहे.
कोंडेश्वर येथे काय काय पाहू शकता.
शिव मंदिर, कोंडेश्वर धबधबा, भोज धरण, तलाव, डोंगर धबधबा, धनगर धबधबा, सूंदर निसर्ग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.