मुंबईकर तुमचं टेन्शन संपलं, लवकरच जलसंकट दूर होणार

मुंबईकर तुमचं टेन्शन संपलं, लवकरच जलसंकट दूर होणार
Updated on

मुंबईः ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज क्षमतेच्या ९४ टक्के पाणीसाठा आहे. अनेक दिवसांपासून पावसाची संततधारा सुरू असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे.  यामुळेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. सध्यस्थितीत ७ ही तलावांत एकूण ९३.७४ टक्के जलसाठा आहे. तर तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे ४ तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.

आता केवळ अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तीनच तलाव भरणं शिल्लक आहे. मध्य वैतरणा व भातसा हे दोन तलाव ९५ टक्के भरले आहेत. उर्ध्व वैतरणा तलाव ८३ टक्के भरला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.  सध्या १३ लाख ५६ हजार ७३२ दशलक्ष लीटर पाणीसाठा तलावात जमा असून भातसा हा प्रमुख तलाव ९४ टक्के भरला आहे. जून,जुलै महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे मुंबईत ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.ऑगस्ट मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे २१ ऑगस्ट पासून ही पाणी कपात १० टक्‍क्‍यांवर आणण्यात आली.  ही उर्वरित १० टक्के पाणीकपातही रद्द होणार आहे.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

तलाव साठा  आवश्‍यक साठा टक्के
       
अप्पर वैतरणा १८८८९८ २२७०४७ ८३.२०
मोडकसागर १२८९२५ १२८९२५ १००
तानसा १४४२३० १४५०८० ९९.४२
मध्य वैतरणा १८४४१४ १४५०८० ९५.२९
भातसा ६७४५११ ७१७०३७ ९४.०७
विहार २७६९८ २७६९८ १००
वर्ष पाणीसाठा
   
२०२० १३,५६,७३२ दशलक्ष       लीटर (९३.७४ टक्के )
२०१९ १३,८४,९५५ दशलक्ष       लीटर (९५.६९  टक्के )
२०१८ १३,५४,३९४ दशलक्ष       लीटर (९३.५८  टक्के )

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai four lake overflow Accumulated 93 Percent Water storage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.