मुंबई: मुंबईत 1 एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. या टप्प्यात 45 वयोगटातील लोकांना लस घेणे शक्य होणार आहे. या लसीकरणाच्या टप्प्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
45 वयोगटातील लोकांना मुंबईतील एकूण 108 कोविड 19 लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे. पालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध आहेत. पण, सर्वात जास्त साठा हा सध्या कोव्हिशिल्ड लसीचा पुरवला जात आहे. दरम्यान, पुढच्या टप्प्यासाठीही पालिकेकडे लसीच्या जवळपास साडेतीन लाख कुप्या उपलब्ध आहेत. किमान पुढील एक आठवड्यासाठी या कुप्या पुरतील आणि गरजेनुसार त्या पुन्हा मागवता येतील असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
30 मार्चपर्यंत 11 लाख 24 हजार 958 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात तीन गटांचा समावेश आहे. फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी ज्येष्ठ नागरिक आणि 45 वयोगटातील सहव्याधीसह जगणाऱ्या लोकांचा समावेश आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक गटातील लोकांना प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे.
पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांची परवानगी
सध्या 108 केंद्र लसीकरणासाठी काम करत आहेत. त्यातील पालिकेच्या 10 केंद्रांना 2 पाळ्यांमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिथे स्टाफ सुद्धा पुरवण्यात आला आहे. पण, स्थानिक पातळीवर हा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कारण, आता कोविड 19 चे रुग्ण ही वाढत असल्याकारणाने तो ही भार त्यांच्यावर आहे. तसेच खासगी लसीकरण केंद्रांना 24 तास लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तिथे त्यांना 250 भरुन लस टोचून घेता येणार आहे.
गर्दी झाल्यास केंद्र वाढवण्याचा विचार
लसीकरण केंद्र आणि कालावधी अशा दोन्ही गोष्टींमध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी वाढल्यास पालिकेच्या रुग्णालयांमध्ये केंद्र वाढवण्याचा विचार आहे.
साडेतीन लाख कुप्या उपलब्ध
45 वर्षावरील सहव्याधी लाभार्थ्यांचे लसीकरण 31 मे पर्यंत कालावधीत आटोपण्याच्या बेतात पालिका होती. मात्र, मध्यंतराच्या काळात काही गर्दी वाढल्यास कालावधी देखील वाढवण्याच्या भूमिकेत पालिका आहे. सध्या साडे तीन लाख कुप्या उपलब्ध असून जरी दर दिवशी 50 हजार लोकांचे लसीकरण झाले तरी एक आठवडा पुरेल एवढा साठा पालिकेकडे आहे. यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा साठा अधिक मिळत असल्याचे काकाणी यांनी सांगितले.
-------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai fourth phase vaccination begins today 108 centers People aged 45 and above
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.