Police Arrested
Police Arrestedsakal media

Mumbai : मुंबईतील बड्या व्यावसायिकाला धमकी प्रकरण आरोपी गॅगस्टर गणेश शिंदेला अटक

शेट्टी यांनी वांद्रेच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना
Published on

मुंबई : मुंबईतील एका बड्या व्यावसायिकाला धमकी दिल्या प्रकरणी गॅगस्टर गणेश शिंदेला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी गॅगस्टर गणेश शिंदेकडून प्रसिद्ध व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांना धमकी देण्यात आली आहे

शेट्टी यांनी वांद्रेच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना. गणेश शिंदे याच्यासह काही जणांनी त्यांना पैशांसाठी धमकावल्याची तक्रार रविवारी 16 ऑक्टोबरला त्यांनी वांद्रे पोलिसात दिली होती. या प्रकरणी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसात गणेश शिंदे व इतर आरोपींविरोधात भा.द.वि 385 ,452 ,506(2), 34 कलमांतर्गग गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत होती. पोलिसांनी आरोपी गणेश शिंदेचा माग काढत सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी त्याला जेरबंद केला. या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी हा गुन्हा आता मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.