Mumbai Ganpati Festival : संपूर्ण मुंबईत मुर्तीकारांची रंगकाम करण्यासाठी लगबग

Mumbai Ganpati Festival
Mumbai Ganpati Festivalsakal
Updated on

Mumbai Ganpati Festival : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच चिरनेर आणि उरण परिसरातील मूर्तिकारांची मूर्ती रंगकाम करण्याची लगबग सुरू झाली आहे. उरलेल्या कमी वेळेमुळे येथील मूर्तिकार हे काम रात्रंदिवस करीत आहेत.

मात्र रोज यावेळी तासन् तास वीज खंडित होत असल्याने मूर्तिकार हैराण झाले आहेत. परिणामी त्यांना जनरेटरचा वापर करावा लागत असल्याने जास्तीत भुर्दंड बसत आहे.

उरण तालुक्यात शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. चिरनेर गावातील कुंभार समाज गेली अनेक वर्षे परंपरागत गणपती बनवण्याचा व्यवसाय करण्यात करत आहे. येथील कुंभार समाज भूमिहीन आहेत. पूर्वी शंभर टक्के शाडूच्या मातीपासून ‘इको फ्रेंडली’ अशा पर्यावरणाला पूरक गणपतीच्या मूर्ती येथे बनवल्या जात असत.

Mumbai Ganpati Festival
Mumbai Ganpati Festival : बाप्पाच्या आगमनासाठी सजली मुंबई ; रस्त्यांवर गर्दीच गर्दी

मात्र शाडू मातीच्या मूर्ती या अतिशय नाजूक, खर्चिक असल्याने आणि बाजारातील पेणच्या स्वस्त आणि मजबूत मूर्तींना मागणी वाढल्याने चिरनेरमधील कलाकारांनीदेखील कालानुरूप बदल करून पीओपीच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. येथे पीओपीच्या मूर्ती जरी बनत असल्या तरी शाडूच्या गणेशमूर्तींना चांगली मागणी असते. चिरनेरमधील हे मूर्तिकार आपली कला जोपासत असतानाच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या ठिकाणी वीज खंडित होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. या ठिकाणी दिवसांतून अनेक वेळा वीज खंडित होत आहे. मात्र मूर्तिकाराकडे अवघा आठवडा शिल्लक असल्याने रात्रंदिवस रंगकाम करावे लागत आहे. यासाठी विजेची वाट न पाहता मूर्तिकारांना जनरेटर भाड्याने घ्यावा लागत असल्याने जास्तीचे भुर्दंड बसत असल्याची खंत मूर्तिकार व्यक्त करीत आहेत; तर या सणासुदीच्या दिवसांत तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.

Mumbai Ganpati Festival
Mumbai Ganpati Visarjan 2023 : अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी; मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय

२५ ते ३० गणपती बनवण्याचे कारखाने

शाडूच्या मातीपासून येथे जास्तीत जास्त सात फूट उंचीची मूर्ती बनवली जाते. चिरनेरमध्ये २५ ते ३० गणपती बनवण्याचे कारखाने आहेत. यामध्ये सुमारे ५ हजार लहान-मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात. चिरनेरच्या गणेशमूर्तींना कोळी समाजातील लोकांकडून जास्त मागणी असते.

तालुक्यातील करंजा, मोरा आणि दिघोडा या कोळी समाजाची वस्ती असलेल्या गावातून मोठी मागणी असते. चिरनेरच्या मूर्तींचे रंगकाम हे वेगळे आकर्षण असते. महागडे रंग वापरून जास्तीत जास्त मूर्ती आकर्षक कशी दिसेल, यासाठी येथील मूर्तिकारांची धडपड असते.

Mumbai Ganpati Festival
Pune Ganpati : गणेशोत्सवात पुण्याला धोका? वातावरण बिघडवण्याचा होऊ शकतो प्रयत्न; पुणे पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

गणेशमूर्तींच्या रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने कामे वेळेवर होत नाहीत. आम्हा छोट्या मूर्तिकारांना जनरेटर वापरणे परवडत नाही.

- सुनील चौलकर, मूर्तिकार, चिरनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.