Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबाबत कोकणवासीयांना बांधकाम मंत्र्यांचे भावनिक पत्र!

Mumbai Goa Highway Traffic
Mumbai Goa Highway Trafficsakal
Updated on

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक संतापले आहेत. समृद्धी महामार्ग कमी वेळात उभारला जातो; परंतु मुंबई-गोवा महामार्गाचा मुहूर्त सापडत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केली. त्यानंतर काही ठिकाणी मनसेतर्फे तोडफोड आंदोलनही झाले.

महामार्गाच्या कामाबाबत चहुबाजूने होणाऱ्या टीकेमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकणवासीयांसाठी एक भावनिक खुले पत्र लिहिले आहे. ‘दगड फोडला तर कलाकृती तयार होते आणि तो फेकला तर विध्वंस,’ अशा शब्दांत त्यांनी आंदोलन थांबवण्याचे आवाहन अप्रत्यक्षरीत्या केले आहे. महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्रविरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे, याची कोणी तरी कधी तरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे. मनसैनिक व कोकणवासीयांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेची तोडफोड करून नुकसान करतो? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो; पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः अशीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचे कारण समजण्यापलीकडे आहे.’

कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. त्यातील अनेक समस्यांचे मूळ महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणात आहे, याचीही जाणीव आहे. खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महामार्गाचा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची प्रतिज्ञा केली होती. ती कार्यसिद्धीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम विश्वासही रवींद्र चव्हाण यांनी पत्रात व्यक्त केला.

Mumbai Goa Highway Traffic
Mumbai Goa Highway : महामार्गावर खड्ड्यातून एसटीने प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती

असंख्य अडचणी सोडवणे एक प्रकारचे शिवधनुष्यच होते; पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासीयांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता सीटीबी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्या कायमस्वरूपी सोडवली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालये फोडण्यापर्यंत आता श्रेयजीवींची मजल गेली आहे. तोडफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे. अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरू असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशा प्रकारे आडकाठी आणून यांना नेमके काय साध्य करायचे आहे, हा प्रश्नच आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

Mumbai Goa Highway Traffic
Mumbai Local Breaking : लोकलमधून प्रवास करतांना पाससोबत आता ओळखपत्रही कंम्पलसरी ! 

गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण!
​मुंबई-गोवा महामार्ग आता खरोखरच दृष्टिपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी महामार्गाची एक मार्गिका पूर्ण झालेली असेल, याचा पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांनी पुनरुच्चार केला. डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल, असा शब्दही त्यांनी पत्रात दिला आहे. दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको. आता त्याऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामे करणारी तरुणाईची अवघ्या महाराष्ट्राला साथ हवी आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Mumbai Goa Highway Traffic
Mumbai Crime: मुंबईतील क्रूर प्रकार! जन्मदात्या आईनेच ३९ दिवसांच्या बाळाला १४व्या मजल्यावरून फेकलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.