Mumbai-Goa Highway Traffic Video: "प्रत्येक गणेशोत्सवात तेच..." मुंबई-गोवा मार्गावर चार तासांपासून वाहतूक कोंडी, प्रवासी संतापले

Mumbai-Goa Highway Traffic News: या मार्गावर कालही अशीच परिस्थिती आणि प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला होता. याचा व्हिडिओ शेअर करत प्रवासी म्हणाला की, "मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे अपूर्णच आहे.
Mumbai-Goa Highway Traffic Video
Mumbai-Goa Highway Traffic VideoEsakal
Updated on

Mumbai-Goa Highway Traffic Video Updates:

गौरी-गणपतीनिमित्ताने तळकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गुरुवारी रात्रीपासून प्रवासाला सुरुवात केली. मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठण्यापर्यंत सुसाट प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासास सुकेळी खिंडीत अचानक ब्रेक लागला.

येथे वाहनांच्या दोन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागला होत्या. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेली रहदारी दुपारपर्यंत वाढतच गेली. सुकळी खिंडीत कोंडी होत असल्याचे समजतात वाहनचालकांनी वाकण मार्गे भिसे खिंड ते कोलाड यादरम्यानचा पर्यायी मार्ग निवडला.

सकाळपासून मुंबई-गोवा महामार्गावरही वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, मानगाव ते महाड दरम्यान गेल्या चार तासांपासून प्रवासी अडकून पडले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये मोठा संताप पहायला मिळत आहे.

दरम्यान या वाहतूक कोंडीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन व्हिडिओ शेअर करत एका युजरने लिहिले की, "माणगाव ते महाड दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या 4 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलो आहे. महामार्गावर वाहतुकीचे कोणतेही व्यवस्थापन नाही. गाड्या कशाही पार्क करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शक्य असल्यास हा मार्ग टाळावा."

मुंबई, नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रहिवाशांनी गणेशोत्सवाला गावी जाण्यास सुरुवात केली आहे, मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यावेळी काही प्रवासी तासोंतास त्याच ठिकाणी अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Mumbai-Goa Highway Traffic Video
Times Tower Fire: कमला मिल्स परिसरातील आगीत जेव्हा 14 जणांनी गमावला होता जीव; 200 लोकांसोबत 2017 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

प्रत्येक गणेशोत्सवात...

या मार्गावर कालही अशीच परिस्थिती आणि प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला होता. याचा व्हिडिओ शेअर करत प्रवासी म्हणाला की, "मुंबई-गोवा महामार्ग वर्षानुवर्षे अपूर्णच आहे. प्रत्येक गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि महाराष्ट्र सरकार या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाला केव्हा प्राधान्य देणार?"

Mumbai-Goa Highway Traffic Video
Maharashtra Weather Updates: अतिवृष्टीचा इशारा, सहा लाख लोक विस्थापित, महाराष्ट्रात काय आहे पावसाची परिस्थिती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.