मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे गोखले ब्रीज दुरूस्तीच्या घेतलेल्याने पूर्व ते पश्चिम असा प्रवासाचा पर्याय बंद झाला आहे.
मुंबई - मुंबई महानगरपालिका आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तपणे गोखले ब्रीज दुरूस्तीच्या घेतलेल्याने पूर्व ते पश्चिम असा प्रवासाचा पर्याय बंद झाला आहे. परंतु याचा फटका आता आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर येणाऱ्या प्रवाशांनाही बसू लागलेला आहे. हवाई वाहतुकीने टी २ टर्मिनलवर उतरणाऱ्या प्रवाशांना गोखले ब्रीज बंद झाल्याने प्रीपेड टॅक्सीचा पर्यायही संपुष्टात आला आहे. अनेक प्रवाशांना ही प्रीपेड टॅक्सी सेवा बंद होण्याचा फटका बसला आहे. अंधेरी पश्चिमेला प्रीपेड टॅक्सी सेवा देण्यात येणार नाही असे पत्रकच प्रीपेड टॅक्सी चालकांकडून जाहीर करण्यात आले आहे.
अंधेरीचा गोखले ब्रीजचा पर्याय बंद झाल्याने टॅक्सी चालकांनीही आंतरराष्ट्रीय टी २ टर्मिनलवर अंधेरी पश्चिमेकडील भाडे घेण्यास नकारघंटा वाजवायला सुरूवात केली आहे. आरटीओकडून पुढील आदेश मिळेपर्यंत अंधेरी पश्चिमेला सेवा देणार नसल्याचे पत्रकच प्रीपेड टॅक्सी चालकांकडून जाहीर करण्यात आले आहे. तर काळी पिवळी टॅक्सी चालकांनीही अतिरिक्त पैसे आकारण्याच्या घटना समोर येत आहेत.
सत्येन रोहरा यांनी मंगळवारी टी २ टर्मिनलला उतरल्यानंतर प्री पेड टॅक्सीच्या पर्यायाअंतर्गत सेवा घेण्यासाठीचा प्रयत्न केला. परंतु टॅक्सी सेवा पुरवठादारांकडून टी २ टर्मिनलला लावण्यात आलेल्या सूचनेमुळे त्यांना धक्काच बसला. अंधेरी पश्चिमेला भाडे नाकारण्यात येत असल्याचे त्यांनी सेवा पुरवठादारांकडून कळवण्यात आले. राज्य सरकार आणि पालिकेच्या प्रकल्पांचा हा सामान्य नागरिकांना फटका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये जाणारे, कामाच्या ठिकाणी जाणारे यांच्यासाठी काय व्यवस्था सरकारने केली असाही सवाल करणारे ट्विट त्यांनी केले आहे.
असाच काहीसा अनुभव यश शहा यांनाही आला आहे. तब्बल ४० मिनिटे हुज्जत घातल्यानंतरही त्यांना अंधेरी पश्चिमेला प्रवेश नाकारण्यात आला. काळी पिवळी टॅक्सी चालकांनीही अतिरिक्त २०० रूपये घेऊनच भाडे घेणार असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची प्रतिक्रिया शहा यांनी दिली.
तोटा कसा भरून काढणार?
अंधेरी पश्चिमेला वाहतूक कोंडीत मोठा वेळ खर्ची होतानाच इंधनही जास्त वापरात येत आहे. त्यामुळेच अनेक टॅक्सीचालक याठिकाणचे भाडे घेण्यासाठी नकार देतात. तसेच अनेक टॅक्सी चालकांना या मार्गावर होणारा तोटा यामुळेच भाडे घेण्यासाठी पसंती नाही. म्हणूनच टॅक्सी चालकांनी याठिकाणी नकार द्यायला सुरूवात केली आहे. परंतु अतिरिक्त पैसे घेण्याचे मी समर्थन करत नसल्याची प्रतिक्रिया टॅक्सीमेन युनियनचे ए एल क्वाड्रोज यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.