मुंबईत चक्क शून्य मिलीमीटर पावसाची नोंद

मुंबईत चक्क शून्य मिलीमीटर पावसाची नोंद 7-8 जुलैला पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज Mumbai has witnessed No Rain Day on 1st July 0 per cent rainfall registered
Mumbai-CSMT
Mumbai-CSMT
Updated on

7-8 जुलैला पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज

मुंबई: जूनमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसाने आता मुंबईकडे पाठ फिरवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात १ जुलैला चक्क शून्य मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गाराव्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांना ऐन पावसाळ्यात उकाड्याच्या झळा सोसाव्या लागल्या. गुरूवारी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने विश्रांती घेतली. गेल्या आठवडाभर एखादी मोठी सर किंवा किंचितसा पाऊस कोसळत होता पण आज मात्र मुंबईचे आकाश संपूर्णपणे निरभ्र दिसले. (Mumbai has witnessed No Rain Day on 1st July 0 per cent rainfall registered)

Mumbai-CSMT
काँग्रेसमध्ये कुठलेही अंतर्गत वाद नाहीत - नाना पटोले

गेल्या 24 तासात कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी चक्क 0.0 अशा पावसाची नोंद झाली. दरम्यान, ढग भरून आले की निदान तुरळक पावसाच्या सरी कोसळतील अशी आशा लोकांना वाटते. मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो आहे. मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता कधी पाऊस पडेल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परिणामी मुंबईकरांना कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत असून उकाडा सहन करावा लागत आहे.

Mumbai-CSMT
दहिसर दरोडा प्रकरण: बुटावरून लागला खुन्याचा तपास

7-8 जुलैला पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज

सध्या मान्सून मंदावला आहे. राज्यात पावसाची जशी स्थिती आहे तशीच स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे. 7 ते 8 जुलै मान्सूनचे पुनरागमन होणार असून पावसाळा पुन्हा एकदा सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.