सुनावणीदरम्यान सिद्धार्थ बांठियानं रचली बनावट कथा; हायकोर्टानं दिला दणका!

बॅचलर असल्याचं खोटं सांगत बांठियानं मराठी अभिनेत्रीला फसवणूक तिच्याशी लग्न केलं आहे.
mumbai high court
mumbai high courtsakal media
Updated on

मुंबई : मराठी अभिनेत्रीशी लग्न करण्यासाठी आपण बॅचलर असल्याचं खोटं सांगणाऱ्या सिद्धार्थ बांठियानं आपली बाजू मांडताना मुंबई हायकोर्टासमोर खोटी कथा रचली, पण या कथेवर विश्वास न ठेवता हायकोर्टानं त्याला दणका दिला. बंठियावर बलात्काराचे आरोप असून त्याला या प्रकरणात दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. नऊ वर्षांपूर्वी आरोपी बांठियावर पुण्यात गुन्हा दाखल झाला होता. हिंदुस्तान टाईम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Mumbai HC refuses to provide relief to man facing rape charges for lying about marital status)

mumbai high court
DC Motorsचे मालक, कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

बांठियानं हायकोर्टाला सांगितलं की, मराठी अभिनेत्रीशी 'लग्न समारंभ' आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करणं या बाबी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग होत्या. दरम्यान, आपल्याला आपल्या अभिनेत्री पत्नीनं तिच्या पतीच्या भूमिकेत टीव्ही शोसाठी ऑफर दिली होती, असा युक्तीवाद बांठियानं हायकोर्टासमोर केला. मात्र, हायकोर्टाने ही कथा पूर्णपणे बोगस ठरवली असून त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला.

mumbai high court
"आम्हाला प्रतिप्रश्न विचारुन प्रश्न सुटणार नाहीत"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

पोलिसांच्या माहितीनुसार, बंठियानं सन २०१० मध्ये वर्सोवा येथे मराठी अभिनेत्रीशी लग्न केलं होतं. त्यावेळी त्यांची भेट एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती आणि त्याने तिला आपण बॅचलर असल्याचं सांगितले. त्यांच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर त्याच्या खऱ्या पत्नीनं या अभिनेत्रीला फोन करून बांठियाची खरी माहिती दिली. तीनं सांगितलं की, बंठियाचं केवळ लग्नच झालेलं नाही तर त्याला दोन मुलंही आहेत. हे ऐकल्यानंतर संबंधित अभिनेत्रीला धक्काच बसला. पण या माहितीबद्दल जेव्हा तिनं बांठियाला त्याच्या पूर्वीच्या लग्नाबद्दल विचारपूस केली तेव्हा त्यानं आपला घटस्फोट झाल्याचं तिला सांगितलं. तसेच हे सिद्ध करण्यासाठी त्यानं घटस्फोटाची बनावट कागदपत्रं देखील तिला दाखवली. परंतू नंतर ही कागदपत्रं खोटी असल्याचंही त्यानं कबूल केलं.

mumbai high court
"आम्हाला प्रतिप्रश्न विचारुन प्रश्न सुटणार नाहीत"; फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर

या घटेनंतर बांठिया आणि मराठी अभिनेत्री यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता त्यावेळी या कार्यक्रमात बांठियाची पहिली पत्नी पोहोचली. त्यामुळं हे प्रकरण आणखीनच चिघळलं. तेव्हाच घटस्फोटाच्या कागदपत्रांचा बनावट उघड झाला. दरम्यान, फसवणूक झाल्याच लक्षात येताच पीडित मराठी अभिनेत्रीनं अखेर सन 2013 मध्ये पुण्यात बंठियाविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, कलम 375 (4) नुसार, जर एखाद्या स्त्रीनं आपला कायदेशीर पती असल्याच्या समजूतीतून शाररिक संबंधास परवानगी दिली असेल, पण कथीत पतीला आपण फसवून तिच्याशी लग्न करुन शाररिक संबंध ठेवले असल्यास तो बलात्कार ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()