Mumbai Health: मुंबईतील वातावरणामुळे आजारांमध्‍ये वाढ !

Mumbai weather : दिवसा गरमी; रात्री थंडी
Rumination syndrome
Rumination syndromeesakal
Updated on

Mumbai Health: मुंबईत सध्या विचित्र वातावरणाचा खेळ बघायला मिळत आहे. दिवसा गरम, तर रात्री थंडीचा अनुभव होत आहे. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रासही वाढला आहे.

Rumination syndrome
Mumbai : अजित पवार दिवाळीनंतर राज्याचा दौरा करणार

मुंबईतील कमाल तपमान हे चढेच आहे. शुक्रवारी सांताक्रूझ येथे ३६.५; तर कुलाबा ३५.६ अंश सेल्सियस कमाल तपमानाची नोंद झाली आहे. यामुळे शहरासह उपनगरांमध्‍ये दिवसा प्रचंड उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्री मात्र नेमकी उलट परिस्थिती दिसत आहे. रात्रीचे किमान तापमान घसरले आहे. सांताक्रूझमध्‍ये २१.४ आणि कुलाबा येथे २४.८ अंश सेल्सियस किमान तपमानाची नोंद झाली आहे.

आजारांमध्‍ये वाढ

वातावरणातील बदलामध्ये रात्री गारवा जाणवत आहे. गरम आणि थंड वातारणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. नाक बंद होणे, सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचे प्रमाण वाढले आहे. यात प्रदूषणाने त्यात भर घातली आहे. पुढील आठवडाभर ही परिस्थिती राहण्याची शक्यता असून त्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’चे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rumination syndrome
Mumbai News : जेथे ज्याची ताकद, तेथे त्याला संधी लोकसभेसाठी ‘मविआ’चे बेरजेचे राजकारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.