मुंबई
Mumbai Health News: मुंबईतील मुलांमध्ये कॉक्ससॅकी विषाणूचे प्रमाण
Coxsackie virus In Mumbai : पालकांनी बाधित मुलाला किमान आठवडाभर तरी शाळेत पाठवू नये.
Latest Mumbai News: मुंबईत कॉक्ससॅकी हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरत आहे. या विषाणूमुळे चिकनपॉक्सप्रमाणे हात, पाय आणि तोंडावर पुरळ उमटत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
साधारणपणे लहान मुलांना होणाऱ्या कॉक्ससॅकी व्हायरसमध्ये अनेकवेळा बाधित मुलांना चिकनपॉक्ससारखी लक्षणे दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात हा विषाणू लहान मुलांना अधिक प्रभावित करतो.