Mumbai News : ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत मलेरिया ५७, डेंगी ३२, लेप्टो १४, गॅस्ट्रो ७४ रुग्णांचे निदान झाले आहे. दरम्यान, मुंबईत पावसाळी आजारांचे टेन्शन कायम आहे.
जून महिना कोरडा गेल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले. जुलै महिन्यात वरुणराजा समाधानकारक बरसला. त्यानंतर ऑगस्ट महिना कोरडा गेला तरी पावसाळी साथीच्या आजारांचा फैलाव होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांत साथीच्या आजाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. १ ते ३ सप्टेंबरपर्यंत मलेरिया- ५७, डेंगी- ३२, लेप्टो- १४, गॅस्ट्रो- ७४, कावीळ- १३, चिकनगुनिया- ३ व स्वाईन फ्ल्यू- १ अशा साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत.
पालिकेचे आवाहन
पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार; तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
लाखो रुग्णांचे सर्वेक्षण
लेप्टो, गॅस्ट्रो आणि हेपेटायटीस रुग्णसंख्येत घट झालेली दिसून येत आहे; मात्र सध्या रिपोर्टिंग युनिट २२ वरून ८८० एवढी वाढवण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. यामध्ये महापालिकेचे दवाखाने, खासगी प्रयोगशाळा, खासगी रुग्णालये यांचा समावेश आहे. दरम्यान, घरोघरी जाऊन १९,७३,७२० एवढ्या तापग्रस्त रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ७६,०६,४८१ एवढी घरांची सर्वेक्षण संख्या आहे; तर यात १,८१,६२४ एवढ्या जणांचे एकूण रक्तनमुने घेण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.