Mumbai Health News : मुंबईकरांनो डोळ्यांची घ्या काळजी ; डोळ्यांच्या संसर्गाचे आठवड्याभरात बाराशेहून अधिक रुग्ण

Mumbai Health News : तरुणांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये हा संसर्ग जास्त आहे.
dole sath india
dole sath india
Updated on

Eye Viral Infection : डोळ्यांच्या वाढत्या संसर्गापासून किंवा बुबुळाच्या पुढील भागाचा होणाऱ्या दाहापासून मुंबईला अद्यापि दिलासा मिळालेला नाही. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या सहा दिवसांत नोंद झालेल्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. १ ते ६ ऑगस्ट दरम्यान, शहरात तब्बल १२७५ रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच, डोळ्यांचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ हजार ८८२ रुग्ण नोंदवले गेले आहेत. यासह मुंबईतील पालिका रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांच्या ओपीडीत ही लाल डोळ्यांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढली आहे. नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये हा संसर्ग जास्त आहे.

dole sath india
INDIA : 'इंडिया' आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली; समन्वय समितीमध्ये ठाकरेंचा समावेश होणार का?

राजावाडी रुग्णालयाच्या डोळ्यांच्या ओपीडीत दर दिवशी ६ ते ८ रुग्ण डोळ्यांचा संसर्गाचे येत असून यात तरुण आणि विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. याचबरोबर हा व्हायरल संसर्ग असून डोळे पूर्णपणे बरे होण्यासाठी किमान ७ दिवस लागत आहेत, तसेच, ज्यांच्या डोळ्यांना सूज आणि लालसरपणा, किंवा बुब्बुळांना दाह झाला आहे, त्यांना बरे होण्यासाठी जवळपास दोन आठवडे लागत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

dole sath india
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

सध्या डोळ्यांमध्ये डाव्हायरल इंन्फेक्शनचे प्रमाण अधिक असल्‍यने बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचा प्रकार वाढल्याने त्यांनी काही दिवस शाळेत जाणे टाळले पाहिजे. हा संसर्ग सध्या झोपडपट्टी भागासह दाटीवाटीच्या परिसरात जास्त आढळत आहे.

- डॉ. जिगिशा शर्मा, नेत्ररोगतज्ज्ञ,

राजावाडी रुग्णालय

dole sath india
Mumbai : मासळीविक्रीचे नवे केंद्र करंजा; ससून डॉकला पर्याय, खवय्यांसाठी पर्वणी

दररोज ओपीडीला १० ते १२ रुग्ण येत आहेत. ज्या रुग्णांच्या डोळ्यांतून पाणी येत आहे, त्यांना बॅक्टेरियल संसर्ग असू शकतो. अँटीबायोटिक्स आणि इतर ड्रॉप्स वगैरे देऊन लोक बरे देखील होत आहेत. स्वच्छता आणि अंतर राखल्यास संसर्ग रोखता येईल.

- डॉ. सरोज सहदेव, विभाग प्रमुख, नेत्ररोगतज्ज्ञ,

डी. वाय. पाटील रुग्णालय

dole sath india
Mumbai : हनुमान चालीसा लोकसभेत घुमली,शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली; डोंबिवलीत शिवसेनेची बॅनरबाजी...

संसर्गाला वैद्यकीय भाषेत फोमाईट असे म्हटले जाते. एखाद्याने जर डोळे चोळून तेच हात दरवाज्याला लावले तर तो संसर्ग पसरतो. घरात एका व्यक्तीला हा संसर्ग झाला की, सर्वांना होतो. स्वच्छता पाळणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. नयना पोतदार, विभागप्रमुख,

नेत्ररोगतज्ज्ञ, नायर रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.