Mumbai Rain Video : मुंबईत पावसाचं थैमान; महिला वाहून जाता जाता वाचली; थरारक दृश्ये कॅमेऱ्यात कैद

काल पासून मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
Mumbai Rain Video
Mumbai Rain VideoSakal
Updated on

Mumbai Rain Video : बिपरजॉय वादळामुळे लांबलेल्या पावसाने अखेर महाराष्ट्रात दमदारपणे एंट्री केली असून पुण्यासह मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. मुंबईच्या बहुतांश भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पुराचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Mumbai Rain Video
Santosh Bangar : मंत्रीमंडळ विस्तारावेळी मी 100 टक्के मंत्री म्हणून शपथ घेणार; संतोष बांगरांचा कॉन्फिडन्स

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल होतात. पुराच्या पाण्यामुळे अनेक समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागते. तर लोकल ट्रेन, रस्त्यावरील वाहतूकीत मोठा खोळंबा पावसामुळे होतो. काल पडलेल्या पावसाच्या पुरामध्ये एक महिला पाण्यात वाहून जाता जाता वाचली असून स्थानिक सोसायटीच्या सुरक्षारक्षकामुळे तिचे प्राण वाचले आहेत.

दरम्यान, आमची मुंबई या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चार व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये आपल्याला मुंबईच्या पाण्याचा अंदाज येईल. तर पहिला व्हिडिओ हा अंधेरी सबवे येथील पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्या महिलेचा आहे.

दुसरा गोरेगाव ईस्ट येथील ओबेरॉय मॉल जवळचा पूरसदृश्य परिस्थितीचा, तिसरा दहिसर येथील पुलाखाली कंबरेएवढे साचलेल्या पाण्याचा आणि चौथा व्हिडिओ मुंबई लोकलमध्ये होत असलेल्या पाणीगळतीचा असून पावसामुळे नागरिकांचे काय हाल होत आहेत ते आपल्याला या थरारक दृश्यामधून समजेल.

राज्यात सगळ्यांचे डोळे मान्सूनच्या पावसाकडे लागले होते. पण यावर्षी मान्सूनने राज्यात उशीरा हजेरी लावली असून मराठवाड्यासहित विदर्भात अजून पावसाने हजेरी लावली नाही. पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठवाड्यात मान्सून प्रवेश करेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.