Mumbai Heavy Rain: मुंबईत वादळी वाऱ्यासह कोसळतोय जोरदार पाऊस, रेल्वेला देखील फटका! जनजीवन विस्कळीत

Mumbai Heavy Rain Update: उपनगरातील दहिसर पूर्वेकडील एस वी रोड परिसरातील पेट्रोलपंपा समोरील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
Mumbai Heavy Rain Update
Mumbai Heavy Rain Updateesakal
Updated on

मुंबईत नऊ जूनला मान्सून पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप घेतली. मात्र कालपासून मुंबई सह पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात झाली असून हवेतील उकाडा काहीसा कमी झाला असून गारवा निर्माण झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी वर्सोवा गोरेगाव कांदिवली बोरिवली दहिसर परिसरात पहाटेपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून अनेक सखल भागात पाणी साचण्यास देखील सुरुवात झाली आहे.

उपनगरातील दहिसर पूर्वेकडील एस वी रोड परिसरातील पेट्रोल पंपामोरील सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. यामुळे वाहन चालक आणि या परिसरातून पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


भिवंडीत पावसाची दमदार हजेरी-


सकाळपासून अंधारल्यानंतर भिवंडी शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे अनेक रस्त्यांवर, सखल भागात त्या सोबत बाजारपेठ, भाजी मार्केट, तीन बत्ती या रहदारीने गजबजलेल्या भागात दीड ते दोन फूट पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. तीन बत्ती भाजी मार्केट परिसरातून मोठा नाला असून त्याची सफाई न झाल्याने या भागात दरवर्षी दुकानदारासह ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागते. सकाळची वेळ असल्याने घाऊक भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी किरकोळ विक्रेते येत असतात या भागात पाणी साचल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे.

Mumbai Heavy Rain Update
Rain Update: मुंबईसह 16 जिल्ह्यात पुढील 48 तासांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता; येलो अलर्ट जारी

मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला देखील बसला आहे. अप अँड डाऊन बर जाणाऱ्या घीम्या गतीने धावणाऱ्या सर्व लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहेत.  तर कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणाऱ्या जलद ट्रेन वीस मिनिट उशिरा धावत असल्याने स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.  पावसामुळे सिग्नल मिळत नसल्याने मध्य रेल्वे उशिराने धावत असून डोंबिवली स्टेशनवर देखील प्रवाशांनी गर्दी केली आहे.

Mumbai Heavy Rain Update
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.