Mumbai: सायन उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना बंदी; मध्य रेल्वेचा निर्णय !

Sion FlyOver: मध्य रेल्वेने वाहतूक विभागाला वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे
Mumbai: सायन उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना बंदी; मध्य रेल्वेचा निर्णय !
Updated on

Mumbai: मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेला धोकायदाक सायन उड्डाणपूलावरून जड वाहनांवर शुक्रवारी मध्य रात्रीपासून बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

तसेच यासंदर्भात मध्य रेल्वेने वाहतूक विभागाला रस्ता वापरकर्त्यांसाठी योग्य वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे.

Mumbai: सायन उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना बंदी; मध्य रेल्वेचा निर्णय !
Mumbai Crime: 41 वर्षाच्या इसमाने १५ वर्षीय मुली सोबत केले अश्‍लील चाळे

मध्य रेल्वेची लोकल सेवा आणखी क्षमतेने चालवणे आणि लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या ये-जा करण्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्रिटिशकालीन ११० वर्षे जुना सायन उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन पालिका आणि मध्य रेल्वेने केले होते.

हा सायन उड्डाणपूल २० जानेवारी २०२४ रोजीपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, शिंदे घटाचे खासदार राहू शेवाळे यांच्या हट्टापाई सायन उड्डाणपूल पाडकाम रेल्वेला पुढे ढकलावे लागले. त्यानंतर २९ फेबुवारी २०२४ तारीख पुनर्बांधणीसाठी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दहावी - बारावीच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थाना वाहतूक कोंडीचा फटका बसू शकते.

Mumbai: सायन उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना बंदी; मध्य रेल्वेचा निर्णय !
Mumbai Crime: 41 वर्षाच्या इसमाने १५ वर्षीय मुली सोबत केले अश्‍लील चाळे

त्यामुळे २२ मार्चनंतर पूल वाहतूकीसाठी खुलाच ठेवण्यात आला होता. मात्र, भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबईने त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये विद्यमान उड्डाणपूल असुरक्षित घोषित केले आहे. त्यामुळे प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तातडीने सायन उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना प्रवेश प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवार/शनिवारच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंलबजावी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने वाहतूक विभागाला मालवाहू नेणाऱ्या वाहन चालकांसाठी योग्य वाहतूक नियमन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची विनंती केली आहे.

Mumbai: सायन उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना बंदी; मध्य रेल्वेचा निर्णय !
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.