कोविड महामारी हाताळण्यास राज्य सरकार यशस्वी : मुंबई उच्च न्यायालय

संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल्याचे कोर्टाने म्हंटले आहे.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : राज्यातील कोरोना संकट हाताळण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला आहे, ( MUmbai High court on Maharashtra covid situation )अशी कौतुकाची थाप मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. याशिवाय कोरोना संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल्याचे कोर्टाने म्हंटले आहे. (Mumabi HC appreciate maharashtra government work during pandemic )

Mumbai
ओमिक्रॉनमुळे लसीचा प्रभाव कमी - WHO

मुंबई हायकोर्टात कोरोनाकाळातील (Mumbai HC comment on covid Petition) विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यावेळी कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टाने निकाली काढण्यात आल्या.

यापूर्वी मुंबईसह राज्यातील रूग्णालयांत खाटांची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या प्रश्नांवरही हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्यावर सुनावणीवेळी या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या प्रयत्नांचे राज्यातील इतर महापालिकांनीदेखील अनुकरण करावे, अशा सूचनाही एका सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()