नात्यांमधील मुलांनाही दत्तक घेतले जाऊ शकते - HC

Court
Courtsakal media
Updated on

मुंबई : जी मुले अनाथ किंवा पोरकी (Orphan Children) झालेली असतात केवळ त्याच मुलांना दत्तक दिले जाऊ शकते असे नाही तर नात्यांमध्ये असलेल्या मुलांना देखील दत्तक घेतले (Children Adoption) जाऊ शकते असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. नात्यांमध्ये झालेल्या एका दत्तक विधान प्रक्रियेला नागपूर मधील स्थानिक न्यायालयाने (Nagpur Court) परवानगी नाकारली आहे. या विरोधात दत्तक पालकांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या मनीष पितळे यांनी ही याचिका मंजूर करुन याचिकादारांंना दिलासा दिला आहे. आई वडिलांच्या समंतीने अल्पवयीन मुलाला दत्तक घेण्याची इच्छा त्याच्या आत्याने व्यक्त केली होती. याबाबत कायदेशीर प्रक्रिया (legal Procedure) पूर्ण करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, नात्यामध्ये अशी कार्यवाही होऊ शकत नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल केला आहे. ( Mumbai High Court - blood relation children can be Adopted)

Court
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक!

बाल सुरक्षा कायदा हा केवळ अनाथ किंवा परिस्थितीमुळे हताश झालेल्या बालकांना सुरक्षा देण्यासाठी नसून नातेसंबंध आणि सावत्र आई वडिलांसाठीदेखील आहे. संबंधित याचिकेत मुलाच्या आत्याने दत्तक पालकत्व घेतले आहे. त्यामुळे ते कायद्याच्या तरतुदीमध्ये येतात, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. हा कायदा मर्यादित नसून विशिष्ट मुलांसाठीच नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. कनिष्ट न्यायालयाने ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले.पूर्वीच्या काळी वारसा चालविण्यासाठी अशी नातेसंबंधात दत्तक विधान केले जात असे. कालांतराने गरजू बालकांना यामध्ये घेण्यात आले, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()