Mumbai Latest Update: फलटण कोरेगाव विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या एका उमेदवाराला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार नाही, असे स्पष्ट करत दिगंबर आगवणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दिगंबर आगवणे हे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी २०१९ सालची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती.