Chhota Rajan News: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात राजन याला जामीन मंजूर करण्यात आला असून याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. छोटा राजनने शिक्षेला दिलेले आव्हान निकाली लागेपर्यंत स्थगिती कायम राहणार असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.