कायद्यांची अमलबजावणी होत नसल्याने ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन नाही- HC

Mumbai High Court
Mumbai High Courtsakal media
Updated on

मुंबई : राज्यातील हेरिटेज वास्तुंचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे सक्षम कायदे (law) आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुंबईचा (Mumbai) ऐतिहासिक (historical) वारसा असलेल्या वास्तुंचे संवर्धन होत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) व्यक्त केले आहे. ( Mumbai historical Architectural ignores having law but nothing happens says court-nss91)

तब्बल दिडशे वर्षे जुनी असलेली आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तुच्या यादीत स्थान मिळवलेली दक्षिण मुंबईमधील एस्प्लानेड मैन्शन ही इमारत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. सात वर्षांपूर्वी इमारत दुरुस्तीच्या मागणीसाठी विविध याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या होत्या. या याचिका आता मुख्य न्या दिपांकर दत्ता आणि न्या गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने नुकतीच निकाली काढल्या. राज्य सरकार आणि म्हाडा व मुंबई महापालिकेने या इमारती जपण्यासाठी प्रभावीपणे योजना राबवीली नाही हे खेदजनक आहे.

Mumbai High Court
विहार, तुळशी, पवई धरणाच्या मजबुतीसाठी BMC चा 'हा' आहे प्लॅन

ऐतिहासिक वास्तुचे संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे चांगले कायदे आहेत. पण त्याची अमंलबजावणी पुरेशी प्रभावीपणे केली जात नाही. एस्प्लानेड मैन्शनचा धडा घेऊन अन्य वास्तुंचे जतन करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. एस्प्लानेड मैन्शनची दुरुस्ती होऊ शकते. राज्य सरकार आणि प्रशासनाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली. इमारतीचे मालक नूरानी यांच्यासह इमारतीमधील भाडेकरुंनी दुरुस्तीसाठी याचिका केली होती.

हेरिटेज एस्प्लानेड

पाच मजली एस्प्लानेड मैन्शनचे बांधकाम सन 1860-63 मधील आहे. जौन वौटसन यांनी ब्रिटिश काळात ही लाकडी जिने असलेली, काचेच्या तावदानांचे छप्पर असलेली इमारत बांधली होती. वौटसन हौटेल अशी त्यावेळी तिची ओळख होती. सन 1920 नंतर हौटेल बंद झाले. ही इमारत नूरानी यांच्या नातेवाईकांनी सन 1979 मध्ये टाटा सन्स लिमिटेडकडून करारावर विकत घेतली.

वौटसन हौटेल सुरू असताना एकदा सर जमशेदजी टाटा यांना ते युरोपियन नाहीत म्हणून हौटेलमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर सन 1903 मध्ये वौटसन हौटेलपासून अवघ्या काही अंतरावरच टाटा यांनी ताज महल पैलेस हौटेल सुरू केले होते, अशी आठवण नेहमी सांगितली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.