इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका शास्त्रज्ञाला ईमेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुंबई - इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर या शासकीय संस्थेत कार्यरत एका 35 वर्षीय शास्त्रज्ञाला ईमेलद्वारे दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणात गुन्हा नोंदवून भोईवाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ई मेल पाठवणार्याने ईमेलसोबत दोन लोकांचा शिरच्छेद करतानाचे दोन व्हिडिओही जोडले आहेत. पवईच्या रहिवासी असलेल्या शास्त्रज्ञाकडून 50 हजार रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत शास्त्रज्ञाला धमकीचा ईमेल 11 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाला होता. दुपारच्या सुमारास ईमेल तपासल्यानंतर शास्त्रज्ञाने पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना ईमेलची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम 385, 506 (2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66अन्वये अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांना दिलेल्या जबानीत, शास्त्रज्ञाने सांगितले की ईमेलशी दोन संलग्न व्हिडिओं पाठवण्यात आले. ज्यामध्ये दोन लोकांचा धारदार शस्त्राने शिरच्छेद केला जात असल्याचे होते आणि जर मागणी पूर्ण केली नाही. तर माझा सुध्दा असाच शिरच्छेद करण्याची धमकी होतो. ईमेलमध्ये शास्त्रज्ञाला 24 तासात 50,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली दिली होती, त्यानंतर तो त्याच्याशी पुन्हा संपर्क साधणार नाही. परंतु चाकूने त्याचा शिरच्छेद करेल असे ईमेलमध्ये नमूद करण्यात आले होते. भोईवाडा पोलीस या प्रकरणात ईमेल कोणत्या लोकेशन वरून पाठवण्यात आले याचा तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.