Mumbai : प्रतिमांचा अवमान झालेला नाही, कारवाई नियमानुसारच; पालिका प्रशासनाचा दावा

Shivsena
Shivsena
Updated on

मुंबई - वांद्रे पूर्व येथील राजकीय पक्षाशी संबंधित बांधकामावर महानगरपालिकेने केलेली निष्कासनाची कारवाई ही नियमानुसार केलेली आहे. सदर कारवाई करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा अवमान झालेला नाही, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले आहे.

Shivsena
Pune Crime : 'सीईओ स्कॅम’ बनतेय डोकेदुखी! संवेदनशील माहितीची चोरून नातेवाईकांकडे होते पैशांची मागणी

एच पूर्व विभाग कार्यालयाने सह पोलीस आयुक्त यांच्याकडे दिनांक २० जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीच्या संदर्भाने वांद्रे रेल्वे स्थानकाजवळील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई हाती घेतली होती. त्यासोबत अनधिकृत फेरीवाल्यांविरूद्धही कारवाई करण्यात आली होती.

ही संपूर्ण कारवाई नियमानुसार आणि योग्य पद्धतीने करण्यात आली. या कारवाईबाबत आक्षेप नोंदवत काही घटकांनी सदर कारवाई प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा अवमान झाल्याचा आरोप केला आहे. जनमानसात गैरसमज पसरू नयेत, प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

Shivsena
Ajay Sengar: अजय सेंगर पुन्हा बरळले! संविधानविरोधी वक्तव्य केल्यानं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून चोप

कारवाई करण्यापूर्वी महानगरपालिका प्रशासनानेच कार्यालयातील प्रतिमा, पुतळे तसेच इतरही साहित्य हलविण्याची रीतसर विनंती केली होती. त्याकरिता संबंधित बांधकाम धारकांना सुमारे अडीच तासांचा वेळदेखील देण्यात आला होता. यावेळेत बांधकामधारकांनी सर्व प्रतिमा, पुतळे आणि इतर साहित्यदेखील काढून नेले.

त्यानंतर सदर बांधकामावर निष्कासन कारवाई सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने संपूर्ण बांधकामाची चित्रफित केली व नंतरच बांधकाम निष्कासित केले, असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. ही कारवाई प्रशासनाने नियमानुसार कारवाई केली असून कोणत्याही प्रकारे आकस बुद्धीने कारवाई केलेली नाही.

एवढेच नव्हे तर अनधिकृत बांधकामांसह परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरदेखील कारवाई केली. असे पालिकेने म्हटले आहे. अभियंत्याला मारहाणीबद्दल खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.