Mumbai : महिला लोकल डब्यात सकाळी गस्त वाढवा; चित्रा वाघ यांची रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी

Chitra Wagh
Chitra Wagh
Updated on

मुंबई : धावत्या लोकलमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर अतिप्रसंगच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी (१६) मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांची प्रत्येक्ष भेट घेतली आहे. महिला लोकल डब्यात सकाळी ९ वाजेपर्यत पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Chitra Wagh
Mumbai : सर्व कायदेशीर, केवळ राजकीय दबावाखाली कारवाई; वायकर यांचे सोमय्यांना प्रत्युत्तर

सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान धावणाऱ्या मुंबई-पनवेल लोकलमध्ये एका तरुणीवर एका इसमाने शारिरीक लगट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (ता. १४ जून) ला समोर आली आहे. आरोपीला चार तासात पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

अशा घटना घडू नयेत म्हणून महिला लोकल डब्यात लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पोलिसांचे जवानची वेळ वाढविण्याची मागणी केली आहे. सध्या महिला डब्यात रात्री ८. ३० पासून ते सकाळी ६ वाजेपर्यत जवान तैनात असते.

मात्र सकाळी सीएसएमटी आणि चर्चगेटवरून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात पोलीस तैनात नसल्याने अशा घटना घडत आहे. त्यामुळे महिला लोकल डब्यात सकाळी ९ वाजेपर्यत पोलिस तैनात करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

Chitra Wagh
Agriculture Day : वसंतराव नाईकांच्या जन्मदिनी पंचायत समितीला मिळणार १० हजार रुपये, कृषी दिन साजरा होणार उत्साहात

महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेकडून करण्यात येत असलेल्या सुविधांबाबत चित्रा वाघ यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकाबरोबर चर्चा झाली आहे. यामध्ये दिवाळीपर्यंत १०७ रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक सीसीटीव्हीचे इन्फास्ट्रक्चर येणार आहे. त्यामध्ये एफआरए (फेस रेकग्निशन सिस्टीम ) लावली जाणार आहे.

ज्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे आरोपीला ट्रक करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे गुन्ह्यात घट होणार आहे. याशिवाय मध्य रेल्वेवर ७७१ महिला डबे असून फेब्रुवारी २०२३ पर्यत प्रत्येक महिला डब्यात सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी व्यवस्थापकांनी वाघ यांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.