Career Opportunities : दादरमधील शासकीय मुलींच्या आयटीआयमध्ये नाविन्यपूर्ण ट्रेड, देशभरात करिअरची संधी

यातील प्रत्येक ट्रेडसाठी मुलींना केवळ दहावी उत्तीर्ण हेाणे इतकीच अट आहे.
Mumbai
Mumbai sakal
Updated on

Mumbai - व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांच्या अंतर्गत दादर येथे मुलींसाठी शासकीय आयटीआयमध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि कौशल्यावर आधारीत असलेले ट्रेड उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही मुलींना येथे सहज प्रवेश घेता येतो. येथील सर्वच ट्रेड पूर्ण केलेल्या मुलींना देशभरात करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

Mumbai
Russia War : प्रिगोझिन आणि पुतीन यांची ओळख कशी झाली ?

दादर शासकीय आयटीआयमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षात दोन आणि एक वर्षांसाठी ट्रेड उपलब्ध आहेत. यात कॅम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामींग असिसटंट (कोपा), ड्रेस मेकिंग, कॉस्मोटॉलोजी, फॅशन डिझाईन अँड डेकोरेशन, इंटिरिअर डिझाईन अँड डेकोरेशन, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस आणि प्रिंटर आदी सर्वच एनएसक्युएफ लेव्हल-३ प्रमाणे ट्रेड उपलब्ध आहेत.

Mumbai
Mumbai : एससीएलआर विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळणार; स्टेड केबल पूल उभारणीला वेग

यातील प्रत्येक ट्रेडसाठी मुलींना केवळ दहावी उत्तीर्ण हेाणे इतकीच अट आहे. कॅम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामींग असिसटंट (कोपा) या ट्रेडसाठी सर्वाधिक जागा असून यामध्ये आत्तापर्यंत शेकडो मुलींना करिअर आणि रोजगारांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Mumbai
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

मुलींच्या या शासकीय आयटीआयमध्ये एक वर्षांच्या ट्रेडसाठी शिकाऊ उमेदवारांना विद्यावेतन आणि निर्वाह भत्ताही दिला जातो. तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीहीचा मुलींना लाभ घेण्याची संधी उपलब्ध होत असल्याने मुलींना करिअरसाठी येथील सर्वच ट्रेड हे महत्वाचे ठरत असल्यानेच येथील विद्यार्थिंनींना देशात आणि विदेशातही नोकरी, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे दादर येथील मुलींच्या शासकीय आयटीआयच्या प्राचार्या एन.के. मरसकोल्हे यांनी सांगितले.

प्रवेश घेण्यासाठी आवाहन

कौशल्य विकासावर आधारीत असलेले ट्रेड या मुलींच्या आयटीआयमध्ये असल्याने यासाठी भविष्यात रोजगार आणि नोकरीसाठी इच्छुक असलेल्या मुलींनी https://admission.dvet.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश घेण्याचे आवाहन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.