मराठी गाण्यांवर मुंबई विमानतळावर फ्लॅशमॉब ; वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न

Adani-Airports
Adani-Airportssakal media
Updated on

मुंबई : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा (mumbai international airport) ताबा अदानी ग्रुपने (adani group) घेताच विमानतळावर गुजराती गरबा (gujrati garba viral video) नृत्याचा फ्लॅशमॉबचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अदानी ग्रुपवर भाजपा वगळता सर्वपक्षातील नेत्यांनी टीका केली होती. गरबा कराल तर झिगांट दाखवावा लागेल असा सूचक इशाराही मनसेच्या (mns criticizes) नेत्यांनी दिला होता. शिवायअदानी विमानतळ नावाच्या फलकांवरून शिवसेनेने (shivsena action) केलेल्या तोडफोडीनंतर मराठी विरुद्ध गुजराती वातावरण तापले असतांना, रविवारी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने विमानतळावर मराठी गाण्यावर फ्लॅशमॉब (marathi song) करून वादावर अदानी ग्रुपने फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई विमानतळ यापूर्वी आंध्रप्रदेशच्या जिव्हिके कंपनीकडे व्यवस्थापनासाठी होते. त्यानंतर आता अदानी ग्रुपने विमानतळाचा ताबा घेतला आहे. मात्र पहिल्या दिवसापासून अदानी ग्रुप चे व्यवस्थापन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ताबा घेताच गुजराती गरबा करून महाराष्ट्रातील मराठी भाषिकांना डीवचण्याचा प्रयत्न करण्यात आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या विमानतळाच्या फलका ऐवजी अदानी विमानतळाचे फलक झळकविण्यात आले होते.

Adani-Airports
औरंगाबाद महापालिका क्षेत्राला वगळले ; शिक्षण तज्ञ, संघटनांमध्ये संताप

त्यानंतर अदानी ग्रुपने आपल्या नावाचे फलक सुद्धा विमानतळ परिसरातून हटवले तर शासनाच्या नियमानुसारच विमानतळावरील व्यवस्थापन केल्या जाईल अशी प्रतिक्रिया सुद्धा विमानतळ व्यवस्थापनाला द्यावी लागली होती. त्यानंतर रविवारी स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने अदानी ग्रुपने मराठी गाण्यांवर विमानतळावर फ्लॅशमॉब केला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपच्या माध्यमातून गुजराती विरुद्ध मराठीच्या वादावर फुंकर घालण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे.

''अदानी ग्रुपला हे उशिरा सुचलेल शहाणपण आहे. पण, चांगली गोष्ट आहे. याचे आम्ही स्वागत करतो''.

- नितीन सरदेसाई, नेते, मनसे

''विमानतळ चालवणे एवढी अपेक्षा आहे. विविध राज्यांमधून कंपन्या मुंबईत येऊन काम करतात पण ते इथले होऊन काम करतात मात्र, अदानी ग्रुपने मुंबईतील विमानतळाचे मुख्यालय गुजरात मध्ये नेने, गरबा करणे हे योग्य नाही. त्यामुळे देर आये दुरुस्त आये असचं म्हणावं लागेल''.

- सचिन सावंत, प्रवक्ता, काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.