मुंबई म्युकरमायकोसिसपासून मुक्त होण्याच्या मार्गावर; रुग्णालयात केवळ दोन रुग्ण

Mucormycosis
Mucormycosis sakal media
Updated on

मुंबई : मुंबई आता म्युकरमायकोसिसपासून (Mucormycosis) मुक्तीच्या दिशेने प्रवास करीत आहे. म्युकरमायकोसिस या एका दुर्मिळ बुरशीजन्य संसर्गाचे सध्या केवळ दोन रुग्ण (two patients in hospital) शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत दुसऱ्या लाटेत (corona second wave) या आजाराला सुरुवात झाली. ज्यामध्ये मुख्यतः कोविड-१९ (coronavirus) मधून बरे झालेल्या रुग्णांचा समावेश होता. राज्याच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात आतापर्यंत ७३९; तर उपनगरात २३७ रुग्ण आढळले आहेत.

Mucormycosis
"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

त्यापैकी शहर आणि उपनगरात दोनच सक्रिय रुग्ण आहेत. ३७ वर्षीय सुबोध कुमार (नाव बदलले आहे) हे दोन रुग्णांपैकी एक आहेत, ते सध्या कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कुपर रुग्णालयाचे कान-नाक-घसा शल्यचिकित्सक आणि रुग्णालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विनोद गीते म्हणाले, जवळपास १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णाला किमान दोन ते तीन आठवडे राहावे लागते. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचे कमी रुग्ण आम्ही पाहिले. बहुतेक रुग्ण सुजलेले डोळे, चेहरा, नाकातून रक्तस्रावाच्या तक्रारी घेऊन येतात. आणखी एक रुग्ण केईएममध्ये दाखल आहे, त्याबाबत अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली नाही.

सहयोगी प्राध्यापक आणि कान-नाक-घसा युनिटचे प्रमुख व घसा शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. नीलम साठे म्हणाल्या, म्युकरमायकोसिसचा संसर्ग होण्यासाठी फक्त कोविडलाच दोष देऊ शकत नाही. कोविडमुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते आणि मधुमेहाची पातळी वाढते. कोविड उपचारांदरम्यान बरेच रुग्ण स्टेरॉईडवर होते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळीदेखील वाढते. हे सर्व घटक शरीरात बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती बनवतात. त्यामुळे ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि मधुमेह आहे त्यांनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Mucormycosis
"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

मुंबईत काळ्या बुरशीची लागण झालेल्या ९७६ रुग्णांपैकी ७७० रुग्ण बरे झाले आहेत; तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. २०२ मृत्यूंची नोंद झाली नव्हती, परंतु आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार दोन्ही आजारांवर उपचार घेत असताना कोविड-१९ संसर्गामुळे रुग्णांचा मृत्यू झाला.
कोविडच्या पहिल्या लाटेत बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना कोविड-१९ ची लागण झाली होती. त्यांच्यापैकी अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास या सहव्याधी असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती.

त्यामुळे त्यांना काळ्या बुरशीची लागण झाली. दुसऱ्या लाटेत, कोविडचा ताण अधिक आक्रमक होता. त्यातून अनेक तरुणांनाही संसर्ग झाला. मी म्युकरमायकोसिसने ग्रस्त सुमारे १२० रुग्णांवर उपचार केले आहेत. बहुतेकांमध्ये आम्हाला शस्त्रक्रिया करून भाग काढून टाकावा लागतो.
- डॉ. नीलम साठे, कान-नाक-घसा युनिटचे प्रमुख, केईएम रुग्णालय

बहुतेक रुग्ण ३० ते ५० वर्षे वयोगटातील

खासगी रुग्णालयातील वरिष्ठ कान-नाक-घसा सल्लागार डॉ. अमोल पाटील म्हणाले, कोविड-१९ मधील औषधोपचार आणि त्याचा थेट परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर झाला. जो सर्वांत मोठा परिणाम करणार होता. दुसऱ्या लाटेदरम्यान, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आणि इतर जीवाणू संक्रमणासारखे प्राणघातक बुरशीजन्य संक्रमण सामान्यपणे पाहिले गेले. आम्ही २०२०-२१ मध्ये म्युकरमायकोसिसच्या सुमारे ३५ रुग्णांवर यशस्वी उपचार केले. बहुतेक रुग्ण हे ३० ते ५० वर्षे वयोगटातील होते, त्यांना कोविड संसर्गाचा इतिहास होता आणि त्यांना सायनसचा संसर्ग झाला होता. जास्त संसर्ग असलेल्या रुग्णांनी दृष्टी गमावली आणि मेंदूपर्यंत संसर्ग पसरला तो जीवघेणा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.