नाविन्यपूर्ण शोधासाठी दृष्टी विकसित करावी; दिगंबर दळवी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

डक्सलेजीस ऍटर्नीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदेचे धडे; संचालक दिगंबर दळवी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
ITI
ITIsakal
Updated on

मुंबई - राज्यातील आयटीआयमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ देशातच नाही तर जगभरामध्ये विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक क्षमता ओळखून सतत नाविन्यपूर्ण शोध लावण्यासाठी आपली दृष्टी विकसित करावी, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी केले.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये बौद्धिक संपदा, कौशल्य विकास आणि नाविन्यता आदी विषयावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शोध तसेच नवीन उपक्रमांना देशात आणि जगभरात एक नवीन ओळख व्हावी यासाठी संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक सातपूर आणि नाशिक येथील आयटीआय येथे विद्यार्थ्याना बौद्धिक संपदा या महत्त्वाच्या विषयावर डक्सलेजीसचे ऍटर्नीज या प्रसिद्ध बौद्धिक संपदा फर्मची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

ITI
Mumbai Local : खचाखच भरलेल्या लोकलच्या केबीनमध्ये बसून डोंबिवलीकरांचा प्रवास; पाहा Viral Video

या फर्मचे संचालक व बौद्धिक संपदा विषयातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभ्यासक अड.दिव्येंदु वर्मा यांनी या कार्यशाळेला संबोधित केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व संचालक दळवी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सहसंचालक प्रफुल्ल वाकडे, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी इंद्रयान काकड, प्रभारी उपसंचालक राजेश मानकर, प्राचार्य रवींद्र मुंडासे, प्राचार्य दीपक बावीस्कर, गटनिर्देशक किशोर शिरसाट आदी उपस्थित होते.

यावेळी दळवी पुढे म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक आपली स्वतःची बौद्धिक क्षमता असते. त्याचा वापर करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते आणि याच मार्गदर्शनानंतर चांगले काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. जगभरातील अनेक विषय हे नाविन्यपूर्ण शोध आणि संशोधनातूनच विकसित झाले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआयचे विविध ट्रेड आणि त्याचे शिक्षण घेत असताना आपली बौद्धिक संपदा, बौद्धिक पातळी वाढवावी आणि नवीन शोधासाठी सतत तत्पर राहावे असेही आवाहन संचालक दळवी यांनी केले.

ITI
Mumbai Police : मुंबईत घातपाताची धमकी; धमकी देणारा पाँडिचेरीतून अटकेत

डक्सलेजीसचे व्यवस्थापकीय संचालक अड.दिव्येंदु वर्मा यांनी यावेळी जगभरात काही नाविन्यपूर्ण शोध त्यामागील पार्श्वभूमी विशद करत विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात जगताना आणि तसेच आयटीआय सारख्या विविध ट्रेड चे शिक्षण घेताना आपण संशोधकही कसे होऊ शकतो याविषयी अनेक उदाहरणासह माहिती दिली.

ITI
Mumbai : धक्कादायक ! 14 वर्षीय शाळकरी मुलगी गर्भवती, अल्पवयीन विद्यार्थांकडून अत्याचार

ऍड वर्मा म्हणाले की सतत आपण एखाद्या समस्येवर पर्याय शोधण्याची दृष्टी विकसित केले पाहिजे त्याच दृष्टीमधून आपल्याला नावीन्यपूर्ण शोध आणि त्यात त्यातील मार्ग सापडतो. जगभरामध्ये जे शोध विकसित झाले ते असेच विविध प्रकारच्या समस्या आणि त्याची उकल करण्यातूनच झालेले असल्याचे वर्मा यांनी विशद केले.

हरियाणा मधील एका सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण आणणारा ॲप आणि त्यासाठीचे पेटंट रजिस्टर केले, याचे उदाहरण देत वर्मा यांनी आयटीआय मधील प्रत्येक विद्यार्थी देखील नाविन्यपूर्ण शोध करू शकतात, असे प्रतिपादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.