मुंबई जकात नाक्यावर बस टर्मिनस, बिझनेस हब

Mumbai Jakat Naka Bus terminus business hub
Mumbai Jakat Naka Bus terminus business hubsakal
Updated on

मुंबई : वस्तू व सेवा कर लागू झाल्या पासून वापरा विना असलेल्या जकात नाक्यांच्या भुखंडावर बस टर्मिनस,बिझनेस हब बरोबरच मनोरंजन सुविधा पुरविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून उत्पन्न मिळवण्याचाही महानगर पालिकेचे ध्येय आहे.

लांबपल्याच्या खासगी बसेस मुंबईत उभ्या राहाण्यासाठी जागा नाही.जकात नाक्यांचा वापर यासाठी करण्यात येणार आहे.मुंबईत पुर्व उपनगरात चार आणि पश्‍चिम उपनगरात दोन असे सहा जकात नाके आहेत.त्या पैकी मानखुर्द आणि दहिसर येथील जकात नाक्यांवर प्रयोगिक तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. बाहेरुन आलेल्या बसेस या ठिकाणी थांबल्यावर शहरी बसेने प्रवाशांना त्यांच्या घरा पर्यंत जाता येणार आहे.या वाहतुकीसाठी विशेष आरखडा तयार करण्यात येणार आहे.

Mumbai Jakat Naka Bus terminus business hub
नकली नोटासह तिघांना अटक एक फरार; तेल्हारा पोलिसांची कारवाई

जकात नाके उपनगराच्या हद्दीवर असल्याने तेथे बिझनेस हब उभारण्याचाही विचार पुढे आहे.यासाठी महानगर पालिकेने विकास आराखड्यातही तरतूद केली आहे.शहराच्या हद्दीवर बिझनेस हब उभे राहील्यात शहाराच्या अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी होईलच त्याच बरोबर त्यातून पालिकेला बक्कळ उत्पन्नही मिळेल.असा अंदाज आहे.तसेच,मनोरंजनाच्या दृष्टीने जकात नाक्याच्या काही भागाचा विकास करण्यात येणार आहे.

यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.या सल्लागार नियुक्तीचे काम लवकरच पुर्ण होईल.असे आयुक्त डाॅ.चहल यांनी नमुद केले. मुंबईत सिझनच्या काळात लांब पल्ल्याच्या पाच हजार पर्यंत बसेस येतात. सर्वसाधारण वेळी ही संख्या दोन ते तीन हजार असते. अवजड वाहानांची रोजची संख्या चार ते पाच हजार आहे.

  • - मानखुर्द जकात नका - 29 हजार 774 चौरस मिटर

  • - दहिसर जकात नाका - 24 हजार 682 चौरस मिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.