मुंबई जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर अखेरीपर्यंत सुरू राहणार - इक्बाल सिंह चहल

चौथ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना
Mumbai Jumbo Covid Center will open till end of September Iqbal Singh Chahal
Mumbai Jumbo Covid Center will open till end of September Iqbal Singh Chahalsakal
Updated on

मुंबई : मुंबईत गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच अतिशय गंभीर रूग्णांचा आकडा हा पहिल्यांदा शून्यावर आला आहे. सध्या मुंबईच्या रूग्णालयात २६ कोरोनाचे रूग्ण दाखल आहेत. पण आगामी काळात जुलै महिन्यात कोरोनाच्या लाटेचा अंदाज पाहता येत्या सप्टेंबरपर्यंत जम्बो कोविड सेंटर रूग्णालयाची सुविधा कायम ठेवणार आहे. सध्या मुंबईत कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी १९ हजार बेड्सची सुविधा सज्ज असल्याचेही ते म्हणाले. मुंबईत चौथ्या कोरोना लाटेच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेची नेमकी काय तयारी सुरू आहे, याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आयआयटी कानपूर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार जुलै महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज आहे. तर चौथ्या लाटेचा पीक कालावधी हा सप्टेंबरच्या अखेरीस असेल. म्हणूनच मुंबईतील कोरोना रूग्णांवर उपचार करणारी जम्बो हॉस्पिटल्स ही येत्या सप्टेंबरपर्यंत कायम ठेवणार असल्याची माहिती चहल यांनी दिली. मुंबईत सध्या ७३ हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्णांवर उपचार चालतो. त्यामध्ये जम्बो कोविड सेंटरचाही समावेश आहे.

मुंबईत जम्बो कोविड सेंटरची सुविधा ही बीकेसी १, बीकेसी २ तसेच वरळी येथे आहे. पण आयआयटी कानपूरने मांडलेल्या अंदाजानुसार कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या संकटाकडे नजरअंदाज करून चालणार नाही. तुर्तास मास्क सक्ती काढण्यात आलेली असली तरीही येत्या काळात याबाबतचा निर्णय योग्य वेळी घ्यावा लागेल असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()