मुंबई: कुलाबा (Colaba) येथील काळा घोडा (Kala Ghoda) परिसरातील चौकाला इस्रायलचे (Israel) दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस (Shimon Pares) यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा ठराव महानगर पालिकेच्या महासभेत फेरविचारासाठी मांडण्यात आला आहे. चौकाला सिमॉन यांचे नाव देण्यास काँग्रेस (Congress) आणि समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) विरोध केला होता. या ठरावाचा फेरविचार करण्याची मागणीही दोन्ही पक्षांकडून करण्यात आली होती. काळाघोडा परीसरातील रजनी पटेल मार्ग (Rajni Patel Marg) आणि सोराबजी टाटा मार्ग (Sorabji Tata Marg) या मार्गाला छेदणाऱ्या (Intersection Point) चौकाला सिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा ठराव शिवसेनेच्या सुजाता सानप यांनी महासभेत मांडला होता. मार्च 2020मध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. त्यानंतर या चौकाला सिमॉन पेरेस यांचे नामफलकही लावण्यात आले. मात्र या निर्णयाला काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विरोध केला. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Mumbai Kala Ghoda renaming Issue Shivsena files Reconsideration Application despite Congress Samajwadi Party Oppose)
इस्रायलचे दिवंगत पंतप्रधान सिमॉन पेरेस यांचा नावाचा फलक काळा घोडा चौकात लावल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला गेला. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात हे नाव असलेले फलक हटविण्याचे पालिकेला आदेश देण्याची मागणी केली. या पत्रानंतर समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने पालिकेच्या महासभेत ठरावाची सूचना मांडून या ठरावाच्या फेरविचाराची मागणी केली. महापालिकेच्या 2010च्या धोरणानुसार परदेशी व्यक्तीचे नाव सार्वजनिक ठिकाणी देत नाही. मग हा निर्णय कसा झाला? असा प्रश्नही रईस शेख यांनी उपस्थित केला होता. प्रशासनाने मे महिन्याच्या महासभेत हा ठराव फेरविचारासाठी मांडला आहे. त्यामुळे आता यावरुन शिवसेना आणि भाजप काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
महापौर महाडेश्वरांनी नाकारला होता प्रस्ताव
शिवसेनेकडून पेरीस यांच्या नामकरणाचा प्रस्ताव मांडण्यापूर्वीच 2018 मध्ये भाजपकडून मरीन लाईन्स येथील चौकाला पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, गटनेत्यांच्या बैठकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने विरोध केल्याने तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव नाकारला होता.
(संपादन- विराज भागवत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.