मुंबई : कल्याण डोंबिवलीत ओमिक्रॉनचा शिरकाव

परदेशातून आलेल्या 224 नागरिकांचा शोध घेण्याचे प्रशासनासमोर आव्हान
ओमिक्रॉनचा शिरकाव
ओमिक्रॉनचा शिरकाव esakal
Updated on

डोंबिवली : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या त्या 33 वर्षीय तरुणाचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि एकच खळबळ उडाली. परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांचा कसोशीने शोध घेतला जात असून रविवारी आणखी 50 नागरिकांची यादी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला प्राप्त झाली असून परदेश प्रवास करणाऱ्यांची संख्या 294 झाली आहे. यातील 70 नागरिकांचा शोध पालिका प्रशासनास लागला आहे. तर अद्याप 224 नागरिकांचा शोध घेणे हे आरोग्य विभागापुढे आव्हान आहे. 70 पैकी 6 नागरिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांचा जिनोम सिक्वेन्सिंग चा अहवाल येणं बाकी आहे. यामध्ये 10 व 6 वर्षीय दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून दुबई ते दिल्ली व दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करून आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि तेव्हापासूनच ओमिक्रॉनच्या चर्चांना उधाण आले. डोंबिवली पुन्हा एकदा अलर्ट झाली आणि ज्याची भीती होती तेच झाले. या 33 वर्षीय तरुणाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आलेला जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. राज्यातील पहिला रुग्ण असल्याने राज्यासह स्थानिक आरोग्य विभाग सतर्क झाले.

ओमिक्रॉनचा शिरकाव
देशातील कार्डधारकांच्या संख्येत वाढ; व्यवहारांची उलाढाल वाढली

तो पूर्णपणे लक्षण विरहित...

पालिकेच्या संस्थात्मक विलगिकरणात या तरुणास ठेवण्यात आले आहे. सदर प्रवाशामध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंट सापडल्याचे शासनाने कळविले आहे. मात्र त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. तसेच या रुग्णास सध्या कुठल्याही प्रकारची लक्षणे नसून तो पूर्णपणे लक्षण विरहित असल्याचे पालिकेमार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच्या संपर्कातील 62 जणांची तपासणी

केपटाऊन येथून आलेल्या त्या रुग्णाच्या संपर्कात आलेले कुटुंबातील 12, इमारतीतील 23, विमानातील 25, कॅब ड्रायव्हर आणि फॅमिली डॉक्टर असे मिळून 62 जणांची कोरोना चाचणी पालिकेच्या आरोग्य विमा मार्फत केली गेली आहे. त्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत

6 प्रवासी पॉझिटिव्ह, 2 बालकांचा समावेश

नायझेरिया येथून आलेले एका कुटुंबातील 4 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यात 10 व 6 वर्षीय बालकांचा समावेश आहे. तसेच रशिया व नेपाळ येथून आलेले प्रत्येकी 1 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे सॅम्पल हे जिनोम सिक्वेन्सिंग साठी पाठविण्यात आल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

ओमिक्रॉनचा शिरकाव
मुंबई : मद्य विक्रेते व्हिस्की स्कॉचच्या नवीन दराचा प्रतीक्षेत

म्हणून लस घेतली नाही

सदर रुग्ण हा 6 एप्रिलपासून परदेशात होता. बोटीवर तो कामाला असल्याने त्या ठिकाणी त्यांना लस घेण्याची संधी मिळाली नाही. केपटाऊन येथे त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यानुसार त्यांनी पुढील प्रवास केला.

आरोग्य विभाग सज्ज

नागरिकांनी घाबरून न जाता येणाऱ्या संभाव्य काळात पुरेपूर खबरदारी घ्यावी. मास्क परिधान करणे, सॅनिटायझर चा वापर करणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा. लसीकरण तातडीने करून घ्यावे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग सतर्क आहे. ऑक्सिजन साठा, आवश्यकतेपेक्षा जास्त खाटा, आयसीयू बेड यादृष्टीने यंत्रणा सज्ज आहे. जम्बो कोविड सेंटर तातडीने सुरू करू शकतो अशा अवस्थेत आहेत.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त केडीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.